Cabinet Expansion : आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; NCP च्या कोट्यातून 'या' नावाची चर्चा, भाजपच्या वाट्याला काय?

आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansionesakal
Updated on
Summary

अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यापैकी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

सातारा : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (बुधवार) होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे वाई मतदारसंघासह जिल्ह्याच्या नजरा मंत्रिपदाकडे लागल्या आहेत.

भाजपच्या वाट्याला काही राज्यमंत्रिपदे येणार असल्याने कॅबिनेट मंत्रिपदाच्या रेसमध्ये नाव असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion
Praniti Shinde : 'मोदींच्या पायाखालची वाळू सरकलीये, म्हणून गुजराती स्टाइलनं महाराष्ट्रात लोकशाहीचा खून केलाय'

अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यापैकी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या वाट्याची मंत्रिपदाची एक जागा शिल्लक आहे. शिवसेनेला सात मंत्रिपदे मिळणार असून, भाजपच्या वाट्याला राज्यमंत्रिपदे येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Cabinet Expansion
Sharad Pawar : शरद पवारांबद्दल सदाभाऊंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, 'आता त्यांना गोळ्या घालणार का?'

आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याचे एका कॅबिनेट मंत्रिपदावर आमदार मकरंद पाटील यांची वर्णी लागणार आहे.

भाजपकडून कॅबिनेट मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraj Bhosale) हे मुंबईत ठाण मांडून बसले होते; पण भाजपच्या वाट्याला राज्यमंत्रिपदेच असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Cabinet Expansion
PM मोदींच्या वाढदिनी नामिबियातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत 7 चित्त्यांनी गमावला जीव

त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालकांच्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून केवळ आमदार मकरंद पाटील यांचाच मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नजरा आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.