भारीच! स्ट्रॉबेरीच्या महाबळेश्वरात उगवणार इंडोनेशियाचा निळा भात

Blue Paddy
Blue Paddyesakal
Updated on

भिलार (सातारा) : स्ट्रॉबेरीच्या भागात आता इंडोनेशियातील (Indonesia) निळ्या भाताचे (Blue Paddy) उत्पादन घेण्याचा प्रयोग राबवण्यात येत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बिरमणी येथे या प्रयोगाचा प्रारंभ नुकताच झाला. केशर लागवड, काळा गहू आणि आता नव्या वाणाच्या निळ्या भाताचा प्रयोग केला जात आहे. उपक्रमशील कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे (Agriculture Supervisor Deepak Borde) यांनी महाबळेश्वरच्या मातीत नवनवीन प्रयोग करण्याचा सपाटा लावला आहे. बिरमणी येथे प्रकाश मोरे यांच्या शेतात हे पीक घेण्यात आले आहे. (Experimentation Of Blue Paddy Rice From Indonesia In Mahabaleshwar Taluka Satara Agricultural News)

Summary

स्ट्रॉबेरीच्या भागात आता इंडोनेशियातील निळ्या भाताचे उत्पादन घेण्याचा प्रयोग राबवण्यात येत आहे.

साताऱ्याचे उपसंचालक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते भाताच्या निळ्या वाणाची पेरणी करण्यात आली. वाडा कुंभरोशी, बिरवाडी, भोसे, दानवली, पांगारीतील शेतकरीही हे उत्पादन घेणार आहेत. निळ्या भाताचा पेरणीच्या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, कृषी अधिकारी श्री. दळवी, मंडल कृषी अधिकारी गोपाल बुधावले, कृषी सहायक रोहन निगडे, रणजित शिंदे, वामन मोरे, प्रदीप मोरे, गणपत मोरे, गोपीचंद घाडगे, सुभाष मोरे, सुरेंद्र मोरे, शरद मोरे व मंगला मोरे उपस्थित होते. या वेळी दीपक बोर्डे यांनी निळ्या भाताच्या वाणाविषयी माहिती दिली. हे वाण इंडोनेशियातील आहे. आसामच्या काही शेतकऱ्यांनी या निळ्या भाताच्या वाणाची लागवड केली होती. 2018 मध्ये नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तीन किलो निळा भाताची बियाणे लावले होते. त्यापासून दोन वर्षांत 14 क्विंटल बियाणे उत्पादित केले. त्यातील या वर्षीच्या बियाण्यातील 50 किलो बियाणे महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.

Blue Paddy
VIDEO पाहा : जावळीत ग्रामीण परंपरेची 'साक्ष'; जात्यावरच्या ओव्यांतून कोरोना जागृती
Indonesia Blue Rice
Indonesia Blue Rice

हा निळा भात खाण्यासाठी पौष्टिक आहे. त्यामध्ये प्रोटीन असल्याने शरीराची होणारी झीज भरून निघते. या भातामध्ये कॅल्शियम, आयर्न, झिंक आदी प्रोटिन्स आहेत. शर्कराचे प्रमाणही कमी असते. पंचतारांकित हॉटेलात या वाणाला मोठी मागणी असते. उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने वाऱ्याने तो पडत नाही. एकरी 20 ते 25 पोते साळ निघते. शिजवल्यावर तो जांभळा दिसतो. त्याची साळ निळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे व लांबट आहेत. औषधी गुणधर्म असलेला हा भात शिजवल्यावरही जांभळा दिसतो. सध्या बाजारात 300 ते 500 रुपये किलोदराने विक्री होते. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदळात त्याची गणना होते.

Experimentation Of Blue Paddy Rice From Indonesia In Mahabaleshwar Taluka Satara Agricultural News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.