सातारा : खांद्यावर गोळ्या झेलत शत्रूशी केला सामना

लान्स नाईक रघुनाथ अडसुळे यांच्या उजव्या खांद्यामध्ये गोळ्या लागल्या. अशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी शत्रूला थोपविण्याचे काम सुरूच ठेवले
satara
satarasakal
Updated on

लढवय्या सातारा

पाकिस्तानच्या सीमेजवळील(pakistan border) छेम जुडिया सेक्टरजवळ पोस्टिंग असताना १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध(india-pakistan war) सुरू झाले होते. सर्वप्रथम पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाल्याने काही अधिकारी व जवान धारातीर्थी पडले, तर काही जण जखमी झाले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तान सैन्याकडून गोळीबारास(firing) सुरवात झाली. या परिस्थितीत गस्तीवरील कमांडिंग ऑफिसर हुतात्मा झाले, तर २१६ मेडियम रेजिमेंट आर्टीलरीचे (तोफखाना) लान्स नाईक रघुनाथ अडसुळे यांच्या उजव्या खांद्यामध्ये गोळ्या लागल्या. अशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी शत्रूला थोपविण्याचे काम सुरूच ठेवले...

- प्रशांत घाडगे, सातारा

साप (ता. कोरेगाव) येथील रघुनाथ अडसुळे हे भारतीय सैन्यदलात १९६८ मध्ये भरती झाले. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती जम्मू येथे झाली. १९७० मध्ये शेजारील पाकिस्तानात सार्वजनिक निवडणुका झाल्यानंतर तेथे अवामी लीग या पक्षास बहुमत मिळाले. ही बाब पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व ठेवणाऱ्या पश्चिम पाकिस्तानातील राजकारण्यांना मान्य नसल्याने त्यांनी पूर्व पाकिस्तानातील लोकांवर अन्याय करून अवामी लीगवर बंदी आणली.

satara
बोटीचे सारथ्‍य अन्‌ जंगल वाटेतून प्रवास!

त्यानंतर २७ मार्च १९७१ रोजी अवामी लीगने बांगलादेश स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यावेळेस पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात आश्रित सीमा ओलांडून भारतात येऊ लागल्याने त्याचा ताण भारतीय अर्थव्यवस्थेवर पडला. या परिस्थितीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानातून सुरू असलेल्या बांगला देशासाठीच्या स्वातंत्र्यलढ्यास २७ मार्च १९७१ रोजी पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी श्री. अडसुळे हे छेम जुडिया सेक्टर येथे कार्यरत होते. वरिष्ठांनी दिलेले वायरलेसवरील संदेश घ्यावयाचे व संबंधित अधिकाऱ्यांना पोच करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. ३ डिसेंबर १९७१ रोजी दिलेले

satara
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा; फास्ट टॅग सक्तीचे असल्याने एकच लेन

कर्तव्य पार पाडून ब्रिगेड युनिटमध्ये येत असताना पाकिस्तानकडून सर्वप्रथम हवाई हल्ला झाला. त्यावेळी कर्तव्यावर असणारे कमांडिंग ऑफिसर, सेकंडरी ऑफिसर, लान्स नायक रघुनाथ अडसुळे व वाहनचालक शत्रूशी धैर्याने प्रतिकार करत ब्रिगेड युनिटमध्ये पोचले. दरम्यान, सीमारेषेवर शत्रू राष्ट्रांकडून घडामोडी घडायला लागल्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला ढाकाच्या दिशेने आक्रमण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कमांडिंग ऑफिसर, सेकंडरी ऑफिसर, लान्स नायक श्री. अडसुळे व वाहनचालक छेम जुडिया सीमारेषेवर गस्तीसाठी जीपमधून रवाना होऊन तैनात झाले. सीमारेषेवर कर्तव्य बजावताना रात्रीचे एक वाजता पाक सैन्याकडून जोरदार गोळीबार सुरू झाला.

गोळीबारामध्ये गाडीतील कमांडिंग ऑफिसर हे कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. अशा स्थितीत हुतात्मा कमांडिंग ऑफिसरांचा मृतदेह मागील सीटवर ठेवून गस्तीची जबाबदारी कमांड सेकंडरी ऑफिसर यांनी घेतली. त्यानंतर साधारणपणे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गस्तीचे काम सुरू असताना पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्यावेळी दोन गोळ्या श्री. अडसुळे यांच्या डाव्या खांद्यामध्ये लागल्या. अशाही स्थितीत हार न मानता त्यांनी त्यांचे कर्तव्य सुरूच ठेवले. तोपर्यंत मागून येणाऱ्या भारतीय सैनिकांनी त्यांना सुरक्षितस्थळी ठेवून गोळीबार करत पाकिस्तानी सैन्यास पिछाडी घेण्यास भाग पाडले. हुतात्मा कमांडिंग ऑफिसर व जखमी अडसुळे यांना ब्रिगेड युनिटमध्ये नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. परंतु, श्री. अडसुळे हे जबर जखमी झाल्यामुळे त्यांना एअर अॅब्युलन्सने उधमपूर येथील मिलिटरीचे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. श्री.अडसुळे हे उपचारातून बरे झाल्यानंतर पुन्हा सेवेत रुजू झाले. त्यानंतर सलग दहा वर्षे देशसेवा करून ३० नोव्हेंबर १९८२ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.