राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना (Ration card) ‘ई-केवायसी’चे बंधन घातले आहे.
सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत (National Food Security Scheme) गरीब गरजूंना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ (E-KYC) न केलेल्यांचे रेशनधान्य, तसेच रेशनकार्ड १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.