वाघाच्या जबड्यात तोंड देणाऱ्या ताराबाईंचे कुटुंब उघड्यावर, पोटासाठी पदकही विकून जगावं लागतंय जीवन

वाघाच्या जबड्यात तोंड देणाऱ्या ताराबाईंचे कुटुंब उघड्यावर, पोटासाठी पदकही विकून जगावं लागतंय जीवन
Updated on

ओगलेवाडी (जि. सातारा) : सर्कशीत वाघाच्या जबड्यात तोंड घालून सर्कस विश्व गाजविणाऱ्या येथील जगविख्यात पहिल्या महिला सर्कसपटू (कै.) श्रीमती ताराबाई गुलाम मुल्ला यांचे कुटुंब सध्या अनेक संकटांशी मुकाबला करून हलाखीचे जीवन जगत आहे. संपूर्ण आयुष्य कलेला वाहिलेले कुटुंब आधार तुटलेल्या झुल्यावर लोंबकळत आहे. 

ताराबाईंबरोबर सर्कशीत काम करणारा त्यांचा मुलगा जहॉंगीरचे अर्धांगवायूने निधन झाले. त्यांची पत्नी जहिराबी (वय 74) भाजीपाला विक्रीचा किरकोळ व्यवसाय करतात. ताराबाईचा नातू उस्मानचा एका रिक्षा अपघातात पाय तुटल्याने तो अपंग आहे. सध्या तो हात गाड्यावर वडा-पावचा व्यवसाय करतो. दहा जणांचा संसाराचा तोल मोठ्या कष्टाने कसाबसा सावरला जात आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्या सांगलीच्या सदाशिव कार्लेकरांच्या सर्कशीत 1883 मध्ये दाखल झाल्या. त्या काळात सर्कशीत काम करण्यास महिला कलावंत मिळत नव्हते. 

कुस्तीमधील डावपेच व मल्लखांब या प्रकारातही त्या तरबेज होत्या. माणसांनी भरलेली गाडी त्या आपल्या केसांनी ओढत. छातीवर दगडे फोडून दाखवत. त्यांची वाघाबरोबरची कुस्ती तर फार प्रसिद्ध होती. पुढे त्यांनी स्वतःची ताराबाई सर्कस काढली. मात्र, नैसर्गिक आपत्ती व आर्थिक संकटांनी ती सर्व बाजूने घेरली. अखेर सर्कसही विकायला लागली. ताराबाईवर आयुष्याच्या मावळतीला वयाच्या 110 व्या वर्षी चिरमुरे-फुटाणे विकण्याची वेळ आली. पोटासाठी स्वतःचे घर व मिळालेली पदकेही विकली. ताराबाईच्या कलेच्या योगदानाबद्दल राज्य शासनानेही त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांचा मरणोत्तर सन्मान करावा, अशी लोकांची इच्छा आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.