Satara Farmers : रताळे पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर; किडीचा प्रादुर्भाव, उत्पादनात निम्म्याहून अधिक घट

सध्या काढणी सुरू असलेल्या रताळ्याच्या (Sweet Potatoes) पिकाला किडीचे ग्रहण लागले आहे.
Sweet Potato Crop Karve Goleshwar Satara
Sweet Potato Crop Karve Goleshwar Sataraesakal
Updated on
Summary

सध्या कार्वे, गोळेश्वर येथील शिवारात रताळे काढणीची लगबग सुरू आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना निम्मेसुद्धा उत्पादन हाती लागले नाही.

शेणोली : सध्या काढणी सुरू असलेल्या रताळ्याच्या (Sweet Potatoes) पिकाला किडीचे ग्रहण लागले आहे. कमी पाऊसमान व जमिनीत गारवा नसल्यामुळे रताळ्यास किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट येत असल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भागवता आलेला नाही, अशी अवस्था आहे.

Sweet Potato Crop Karve Goleshwar Satara
बुडालेल्या नौकेवरील खलाशांना वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी; तब्बल 12 तास समुद्राशी झुंज, नरेश ठरला 'देवदूत'

अनेकांनी पीक काढणी करण्यापेक्षा त्यावर अक्षरशः नांगर फिरवला आहे. कार्वे, गोळेश्वर येथील शेतीमध्ये रताळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पिकाचा हंगाम कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे शेतकरी बघतात. उत्पादित मालाला प्रती टन २२ ते २४ हजारांपर्यंत दर मिळाल्यास या पिकाचे अर्थशास्त्र जुळते.

डिसेंबर ते फेब्रुवारीअखेर काढणी असलेले क्षेत्र जादा राहते. याच कालावधीत बाजारपेठेमध्ये दरात चढ - उतार राहिल्याने शेतकरी चिंतेत असतात. गतवर्षी या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले. याउलट यंदा शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसला आहे. कमी पावसामुळे जमिनीत अपेक्षित गारठा उरलेला नाही. परिणामी, जमिनीखालील रताळे फळांच्या वाढीस फटका बसला. तोच फळे किडल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

Sweet Potato Crop Karve Goleshwar Satara
साताऱ्यातील वाईत आढळली 13 व्या शतकातील 'गद्धेगळ शिळा'; इतिहासात 'गद्धेगळ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

सध्या कार्वे, गोळेश्वर येथील शिवारात रताळे काढणीची लगबग सुरू आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना निम्मेसुद्धा उत्पादन हाती लागले नाही. काहींच्या संपूर्ण शेतातील पिकास कीड असल्याने त्या शेतकऱ्यांनी पीक काढणी करण्याऐवजी शेताची पिकासह नांगरणी केली आहे.

या संकटात शेतकऱ्यांवर उत्पादन खर्च बसला आहे. ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले त्यांना कमी अधिक दराची झळ बसत आहे. गेल्या आठवड्यापासून प्रतिकिलो २२ ते २३ रुपये दर मिळत आहे. त्याआधी हा दर कमी होता. निसर्ग आणि दराच्या लहरीपणामुळे रताळे उत्पादक शेतकरी यंदा तोट्यात आहेत.

Sweet Potato Crop Karve Goleshwar Satara
आता वर्षभर पिऊ शकता पावसाचं पाणी! 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत वाढतेय जागरुकता, 'या' समाजात अधिक जागृती

तीन एकर क्षेत्रातील रताळे किडल्यामुळे पीक काढणी करणे उपयुक्त नव्हते. काढणी व मजुरी खर्च करण्यापेक्षा आम्ही पूर्ण पीकच शेतात हिरवळीचे खत म्हणून जमिनीखाली गाढले.

-हिंदूराव माने, गोळेश्वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.