पारंपरिक पद्धतीच्या एकाच पिकांवर अवलंबून न राहता पीक पद्धतीत विविधता आणण्याचे धोरण श्री. अडसूळ यांनी आपल्या शेतात अवलंबले आहे.
लोणंद : पाडेगाव (ता. फलटण) येथील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ (Farmer Ramesh Adsul) यांनी आल्याचे (Ginger Crop) एकरी ४५ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेऊन लाखोंची कमाई केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व माहितीचा वापर करून शेती करण्यावर त्यांचा भर असल्यामुळे ते अन्य शेतकऱ्यांपेक्षा चांगले उत्पादन काढून किफायतशीर शेती करत आहेत.