साखर कारखान्यांची सर्व माहिती खुली करा; शेतकरी संघटनेची मागणी

Sugar Factory
Sugar Factoryesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : साखर कारखान्याच्या (Sugar Factory) सर्व सभासदांना कारखान्याची घटना, नियमावली, पोटनियम दुरुस्तीमधील तरतुदींची संपूर्ण माहिती विनामुल्य पुरवण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे अनिल घराळ (Anil Gharal) व सहकाऱ्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Commissioner Shekhar Gaikwad) यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. (Farmers Association Demands Release Of All Information Of Sugar Factories Satara Marathi News)

Summary

साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना कारखान्याची घटना, नियमावली, पोटनियम दुरुस्तीमधील तरतुदींची संपूर्ण माहिती विनामुल्य पुरवण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्त गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक, धनंजय डोईफोडे यांना श्री. घराळ, नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांनी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, एक टन उसापासून मिळणारी साखर, उपपदार्थापासून मिळणारे उत्पन्न व त्याचा खर्च नफा याची माहिती कारखान्यात फलकावर लावावी, संचालक मंडळ घटना नियमावली पोट नियमात दुरुस्ती करतात, त्याची माहिती सभासदांना दिली जात नाही, ती देण्यात यावी, नियमाप्रमाणे प्रोग्रॅम प्रमाणे ऊसतोड करावी.

Sugar Factory
'जातीभेदाचं राजकारण करणाऱ्या आमदार-खासदारांना जाब विचारा'

तसेच वर्षानुवर्ष तेच संचालक, तेच अध्यक्ष होतात. त्यामुळे स्वच्छ व पारदर्शक काम होत नाही. त्यासाठी दहा वर्षापुढे एका व्यक्तीस अध्यक्ष व संचालक ठेवू नये, साखर कारखान्यावर संचालकांनी किती कर्ज केली आहेत, किती कर्ज फेडलेले आहेत, कारखान्याचा एकूण नफा किती, त्याचे ऑडिट करण्यात येऊन सभासदांना त्याची सविस्तर लेखी माहिती विनामुल्य द्यावी. त्यासंदर्भात राज्यातील सर्व साखर कारखान्यांना सूचना व आदेश देवून स्वच्छ व पारदर्शक कामासाठी कठोर उपाय योजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Farmers Association Demands Release Of All Information Of Sugar Factories Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.