उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदतीची आस

उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदतीची आस
Updated on
Summary

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. पंचक्रोशीतील शेतकरी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत.

उंब्रज (सातारा): अतिवृष्टीमुळे उंब्रजसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, सोयाबीन, भुईमूग, जेवढा यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. पंचक्रोशीतील शेतकरी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत.

उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदतीची आस
उंब्रज ग्रामपंचायतीचा 'महावितरण'ला जोर का झटका; वीज तोडल्याने संताप

उंब्रजसह परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे सोयाबीन, घेवडा, भात, आले, टोमॅटो, तसेच भाजीपाला यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे खराब झाली आहेत, तर काही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. अचानक पडणाऱ्या पावसामुळे शेतात उभ्या असणाऱ्या भुईमूग, सोयाबीन यांसारख्या पिकांना कोंब फुटून पिके हाताबाहेर गेली आहेत, तर काढलेले सोयाबीन काळे पडल्याने व्यापारी कमी भावाने खरेदी करत आहेत.

उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदतीची आस
उंब्रज, मसूर, चाफळला 162 मोटरसायकल जप्त; कऱ्हाडात पोलिसांची धडक कारवाई

गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली होती, तर शेतात पाणी साठल्याने कुजून गेली होती. त्यातूनही उगवलेल्या पिकांचे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली असून, ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अवस्था बिकट झाली आहे, तर पंचक्रोशीतील शेतकरी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत.

उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदतीची आस
उंब्रज परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ; दहशत निर्माण करत माफियांचा राजरोस उपसा

जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली. या परिसरात कृष्णा, मांड, तारळी नदीपात्रांना दोन वेळा महापूर आला. त्यामुळे नदीकाठचे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, निव्वळ कागदावर पंचनामे झाले आहेत; परंतु वस्तुस्थिती एकाही शेतकऱ्यांना मदत झाली नाही. त्यामुळे खरीप हंगामात बुडालेला शेतकरी रब्बी हंगामात पेरणी करण्याचे धाडस करत नाही. भुईमूग, सोयाबीन, भात या महत्त्वांच्या पिकांबरोबर कडधान्य व फळभाज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()