पाटण (जि. सातारा) : मालकीच्या जागेतील पाणी पळवून नेणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करावी, गावगुंडांना पाठीशी घालून अन्यायग्रस्त शेतकऱ्याला खोट्या केसेसमध्ये अडकविण्याचा दबाव टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, शेतीचे झालेले नुकसान भरून मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी डफळवाडी (ता. पाटण) येथील धुळाराम शिंदे या अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबासमवेत शेतात मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने साेमवारी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांना मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी निवेदन दिले आहे. धुळाराम शिंदे यांचे कुटुंब शेती करून आपली गुजरान करते. त्यांच्या पडीक शेतात पाण्याचा झरा असून, त्या पाण्यावर ते शेती पिकवितात. मात्र, स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी काहींनी पाणी इतर लोकांना दिले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबाचे शेतीचे नुकसान झाले आहे.
यशवंतरावांनी नागा साधूंचा मोर्चा हाताळला; मोदी सरकारला शेतकरी आंदोलन का हाताळता येईना?
पाण्यासाठी असणाऱ्या पाइपची मोडतोड केली असून, धुळाराम शिंदे यांच्या कुटुंबातील महिलांना मारहाण केली आहे. याबाबत फिर्याद देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी दमदाटी केली आहे. फिर्याद घेतली गेली नाही, तरी झालेल्या घटनेनुसार फिर्याद दाखल करून पाणी पळवून शेतीचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी, यासाठी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचे मारुती जानकर यांनी सांगितले.
मागण्यांसंदर्भात शासनाने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जानकर यांनी दिला आहे. धुळाराम शिंदे यांच्या शेतात शिंदे कुटुंबाने साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
खातगुणच्या ब्रिटिशकालीन धरणाचे होणार पुनरुज्जीवन; शरद पवारांची जलसंपदा मंत्र्यांकडे शिफारस
ग्रामपंचायतीच्या अंगणात पेटवली चुल; जेवणाचा लुटला आनंद
वेशांतर करून एलसीबीचा छापा; ओगलेवाडी, कामथीतील युवकांना पिस्तूल, काडतुसांसह सुर्लीत अटक
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.