-स्नेहल माने
सातारा : "14 हजार खर्च केलेत एका एकराला, एकूण अडीच एकर कांदा लावला होता. रोपं विकत आणलेली वेगळी, खतं घातलेली वेगळी. मागचं कर्ज अजून फेडलेलं नाही, तोवर पावसानं घात केला." दहिवडीतील (Dahiwadi) एक कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) शेताच्या बांधावर बसून आपली कर्मकहाणी सांगत होता.