केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या ऑनलाइन कामकाजासाठी संपूर्ण राज्याला एकच सर्व्हर देण्यात आला आहे.
कऱ्हाड : ई-पीक पाहणी नोंदणी (E-Pik Vima) एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे. मात्र, मोबाईलवरून ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना (Farmers) अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची अडचण आहे. मोबाईलला नेटवर्क आले, तर सर्व्हर चालत नाही. त्यामुळे भरलेली माहिती अपलोड होत नाही. एकेका नोंदणीसाठी दोन-तीन दिवस प्रयत्न करूनही फॉर्म अपलोड होत नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी नोंदणीस प्रतिसादही कमी मिळत आहे. परिणामी, मुदतीत नोंदणी करण्याचे आव्हानच शेतकऱ्यांपुढे असणार आहे.