मुलगी झोपेत असताना तिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने व लोखंडी अँगलने मारहाण करून गंभीर जखमी करून तिचा खून करून स्वत: पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली होती.
सातारा : लग्नासाठी (Marriage) आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही, म्हणून मुलगी झोपेत असताना वडिलांनी रागाने तिच्या डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात आरोपी शंकर बजरंग शिंदे (वय ७८, रा. औंध) या वृद्धास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.