आमदार शिंदेंना रोखण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचा 'पत्ता ओपन'

Shivendrasinhraje Bhosale
Shivendrasinhraje Bhosaleesakal
Updated on

कुडाळ (सातारा) : जिल्ह्याच्या सहकारातील मोठी संस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे (Satara District Bank Election) पाहिले जाते. या बँकेचे खासदार-आमदार त्याचप्रमाणे राजकीय दिग्गज मंडळी प्रतिनिधीत्व करत आहेत. सध्या बँकेच्या निवडणुकीचे मार्ग मोकळे झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जावळी तालुक्यातून सोसायटी मतदार संघातून प्रतिनिधीत्व करणारे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना बँकेत जाण्यापासून रोखण्यासाठी जावळी तालुक्यातील (Jawali Taluka) राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यावेळी जावळीतून जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे (Archana Ranjane) यांचे पती व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांचे निकटचे समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरून चांगलेच दंड थोपटले असून आमदार शिंदेंना आव्हान निर्माण केल्याने ही बँक निवडणूक तालुक्यातून बिनविरोध होणे कठीण वाटत आहे.

Summary

जिल्ह्याच्या सहकारातील मोठी संस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे (Satara District Bank Election) पाहिले जाते.

जावळी तालुक्यात एकूण ४९ विकास सेवा सोसायटी आहेत. जिल्हा बँकेत आतापर्यंत सोसायटी मतदार संघातून तालुक्यातून माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे, भिकू धनावडे, कै. राजेंद्र शिंदे, श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे, तर गत दोन निवडणुकीत जावळीचे माजी आमदार आमदार शशिकांत शिंदे हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. यावेळी बँक निवडणुकीत विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेले पहायला मिळत आहेत. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जावळीतील राजकीय गणिते पूर्णतः बदलून गेलेली आहेत. शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव मधून पराभव झाल्यामुळे आपले संपूर्ण राजकीय लक्ष जावळी तालुक्यावर ठेवले आहे. त्यामुळेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांनमध्ये मनभेद निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांनी अनेक सोसायट्यांचे ठराव घेण्यापासून कमालीची तयारी सुरू केलेली पहाता, आमदार शशिकांत शिंदे यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी जाईल, असे वाटत नाही.

Shivendrasinhraje Bhosale
निवडणुकीत उदयनराजे 'NCP'कडे तीन जागा मागणार

दोन्ही बाजूंनी तालुक्यातील सोसायटी ठराव आपल्याच बाजूंनी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. रांजणे यांनी सोसायटी मतदारांच्या गाठी-भेटींवर जोर दिला आहे, तर आमदार शिंदे देखील जावळीत तळ ठोकून आहेत. रांजणे यांना पडद्यामागून खरी ताकद कोणाची मिळत आहे, हे तालुक्यातील राजकीय जाणकारांना चांगलेच माहिती असल्यामुळे सोसायटी मतदार देखील चांगलेच भांबावून गेलेले पहायला मिळत आहेत. अशात बहुतांश सोसायट्या या कुडाळ, सायगाव भागात असल्यामुळे मतदारांची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे. तर या निवडणुकीत आमदार शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे असा सामना रंगलाच तर मतदारांचा दर वधारणार हे निश्चित!

Shivendrasinhraje Bhosale
कर्नाटकात 'शेहनशाह'ची लक्झरी कार जप्त; बंगळूरू RTO ची कारवाई

वसंतराव मानकुमरेंना करावी लागणार कसरत

तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून वसंतराव मानकुमरे यांना ओळखले जाते. मात्र, ते ज्या जावळी सहकारी बँकेचे नेतृत्व करतात त्या बँकेची निवडणूक देखील तोंडावर आली आहे. त्यामुळे जावळी बँक ताब्यात ठेवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदेंची मोठी मदत त्यांना होते. तर त्याचे पूर्ण राजकारण जिल्हा परिषद निवडणुकीवर अवलंबून असल्यामुळे ती ही निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे मानकुमरे बुचकुळ्यात पडलेले पहायला मिळतात. जर ही निवडणूक बिनविरोध झालीच नाही, तर त्यांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशीच होणार आहे. तालुक्यातील भविष्याच्या राजकारणाचा विचार करता, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही वरदहस्त मिळवण्यासाठी मानकुमरे यांना त्यांच्यासोबत राहणे गरजेचे आहे. एकूणच, आमदार शिंदे का आमदार भोसले नक्की कोणाला साथ द्यायची याबाबत त्यांची गोची होण्याची शक्यता आहे.

Shivendrasinhraje Bhosale
ठाकरेंना 'राणे प्रकरण' भोवणार

कुडाळकरांची साथही ठरणार महत्वाची

तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्थापैकी प्रतापगड कारखाना, जावळी खरेदी विक्री संघ, पतसंस्था आदी सर्व संस्था ह्या कुडाळच्या कारखाना गटाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे निर्णायक ठराव कुडाळकरांच्या हातात असल्याने त्यांची साथही मोलाची ठरणार आहे. निवडणूक लागलीच तर मात्र राजकीय खेळात कुडाळकर यांना देखील मोठ्या राजकीय पेचाला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्याचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या अनेक मंडळींना ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेच वाटत असावे, तर सोसायटी मतदारांसह सभासदांना मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊच नये, असेच सध्या तर वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.