बिअरबारच्या परवानगीवरून साताऱ्यातील धावरवाडी ग्रामसभेत हाणामारी

Beer Bar in Dhawarwadi
Beer Bar in Dhawarwadiesakal
Updated on
Summary

बिअरबारला परवानगी दिल्याच्या कारणावरून ग्रामसभेत हाणामारी झालीय.

उंब्रज (सातारा) : बिअरबारला परवानगी (Beer Bar Permission) दिल्याच्या कारणावरून धावरवाडी (Dhawarwadi Gram Panchayat) येथील ग्रामसभेत हाणामारी झाली. त्यात शासकीय मालमत्तेचे नुकसानीसह एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. सकाळी अकराच्या सुमारास घटना घडली. गावात त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. सायंकाळी पोलिसात (Police) परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. त्यात तीन फिर्यादी आहेत. त्यानुसार १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून दारू दुकानाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सचिन शेळके यांनी तक्रार दिली आहे. त्यात फिर्यादीसह नानासाहेब शेळके, संजय चंदुगडे, महेश चंदुगडे, विलास शेळके, कृष्णात चंदुगडे, राहुल कदम, नीलेश शेळके, संभाजी शेळके यांनी सरपंच महेश सुतार यांना ऐनवेळेच्या विषयावेळी प्रश्न विचारला. त्यात मागील ठरावात बिअरबारला परवानगी का दिली, असे विचारत त्यांनी सरपंच महेश सुतार, श्रीकांत चव्हाण, प्रज्वल चव्हाण, शंकर चंदुगडे, सागर चव्हाण, दादासाहेब चंदुगडे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. या वेळी सागर चव्हाणला लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केले. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल आहे.

Beer Bar in Dhawarwadi
'30 वर्षे कुस्‍त्‍या केल्‍या, पण आईनं पाजलेल्‍या दुधावरच'

सरपंच महेश संभाजी सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीत ग्रामसभा चालू असताना गावातील संजय चंदुगडे, सचिन शेळके, महेश चंदुगडे, विलास शेळके, कृष्णात चंदुगडे, नीलेश शेळके, राहुल कदम, नानासाहेब शेळके यांनी मागील ग्रामसभेत तुम्ही निखिल साळुंखे यांना बिअरबारची परवानगी कशी काय दिली, असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. गावातील संजय चंदुगडे, श्रीकांत चव्हाण, प्रज्वल चव्हाण व सागर चव्हाण यांना सचिन शेळकेने मारहाण केली.

Beer Bar in Dhawarwadi
उधारीचे 20 हजार मागितले म्हणून कुऱ्हाडीनं 14 वार करून तरुणाला संपवलं

ग्रामसेवक विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत ग्रामसभा असताना सचिन शेळकेने ऐनवेळेच्या विषयांमध्ये सरपंच सुतार यांना तुम्ही मागील ग्रामसभेच्या ठरवात बिअरबारला परवानगी कशी काय दिली, असे विचारले. त्यावरून सरपंच सुतार आणि सचिन शेळकेसह ग्रामस्थांत बाचाबाची झाली. त्यानंतर थेट मारामारी सुरू झाली. महेश चंदुगडे, नीलेश शेळके यांनी विनापरवाना मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग केले. त्यावेळी ग्रामसवेक शिंदे यांनी नियमानुसार ग्रामसभा चालू आहे, तुम्ही शूटिंग करू नका असे सांगितले. त्यावेळी दोघांनी ग्रामसेवक शिंदे व सरपंच सुतार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ग्रामपंचायतीच्‍या इंटरनेट सेवेचे साहित्याची मोडतोड केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beer Bar in Dhawarwadi
च्युइंगम खाल्ल्यामुळं 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()