Republican Sena : 'सरकारचा मनुवादी चेहरा उघड, संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औरंगजेबप्रकरणी बेभान होऊन तिखट प्रतिक्रिया दिली.
Sambhaji Bhide
Sambhaji Bhideesakal
Updated on
Summary

भिडेंवर कारवाई होत नसेल तर देशाच्या व राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लीकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सातारा : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी देशाच्या ध्वजासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आदेश पोलिस प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Sambhaji Bhide
Anil Deshmukh : ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपनं उचलला विडा; माजी गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

रिपब्लिकन सेनेचे (Republican Sena) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकात म्हटले, की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी औरंगजेबप्रकरणी बेभान होऊन तिखट प्रतिक्रिया दिली. तसेच संबंधितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले.

मात्र, संभाजी भिडे यांनी देशाच्या ध्वजाबद्दल केलेल्या विधानाबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्याबद्दल फडणवीस यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, तसेच संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला द्यावेत, अशी आमची मागणी आहे.

Sambhaji Bhide
KS Eshwarappa : '..म्हणून कर्नाटकात ऑपरेशन लोटस् अपयशी ठरलं, त्या बेशिस्त आमदारांची शेपूट छाटणार'

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सोमोटो गुन्हे दाखल करणारे पोलिस प्रशासन आता गप्प का? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेस पडला आहे. त्यामुळे या सरकारचा मनुवादी चेहरा उघड झाला आहे. आता देशाच्या स्वातंत्र्यावर आणि राष्ट्रध्वजावर आक्षेप घेणारे भिडे यांच्या विधानाने देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

Sambhaji Bhide
Refinery Project : रिफायनरी प्रकल्प होणारच; नारायण राणेंचे स्पष्ट संकेत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा

त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना गृहमंत्री यांनी द्यावेत, अशी आमची मागणी आहे. भिडेंवर कारवाई होत नसेल तर देशाच्या व राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लीकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.