कऱ्हाड पालिकेत पाच दिवसांचा आठवडा रद्द

मुख्याधिकाऱ्यांचा आदेश; कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा परिणाम
karad
karadsakal
Updated on

कऱ्हाड : शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थात कामाचे तास वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला आहे. मात्र, कऱ्हाड पालिकेत कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पालिकेचे कामकाज शनिवारीही सुरू राहणार आहे.

पालिकेत वेगवेगळे ११ विभाग आहेत. त्यात ३२४ कर्मचारी आहेत. पालिकेने मध्यंतरी पाच दिवसांचा आठवडा केला. तो करताना कामाचे तास वाढवले. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ अशी कामाची वेळ करण्यात आली. त्यानुसार पालिकेतही कामकाजाची ती वेळ निश्चित केली गेली. मात्र, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी ठरवलेल्या वेळेत कधीच आले नाहीत. मुख्याधिकारी डाके यांनी त्यांना वेळेत येण्याबाबत लेखी, तोंडी सूचना केल्या. मध्यंतरी लेट कमर्स अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन व वाजंत्री वाजवून त्यांचे स्वागत केले. उशिरा येणाऱ्यांसाठी महिनाभर तो प्रयोग झाला.

मात्र, तरीही पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत येणे टाळले. परिणामी त्याचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. त्याबाबत मुख्याधिकारी डाके यांनी त्याकडे अधिकारी, कर्मचारी यांना सूचीत केले. मात्र, तरीही कामावर परिणाम झाला नाही. पालिकेच्या कामावर होणारा परिणाम टाळण्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा कमी व्हावा, यासाठी पालिकेतील पाच दिवसांचा आठवडा रद्दचा निर्णय मुख्याधिकारी डाके यांनी जाहीर केला.

मुख्याधिकारी डाके यांनी त्याचा कार्यालयीन आदेश काढून त्याच्या सूचना जाहीर केल्या आहेत. शासनाने सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत कामकाज सुरू राहील, या अटीवर शासकीय कामाचे दिवस सोमवार ते शुक्रवार असे ठरवले होते. मात्र, पालिकेचे ९० टक्के कर्मचारी शासनाने दिलेल्या वेळेत कामावर येत नाहीत. त्यामुळे शासनाने केलेल्या पाच दिवसांच्या आठवण्याऐवजी सोमवार ते शनिवार या वेळेत काम सुरू राहील, असे मुख्याधिकारी डाके यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.शासनाने नेमलेल्या वेळेनुसार पालिकेचे ९० टक्के कर्मचारी कामावर हजर राहात नाहीत. त्यामुळे सोमवार ते शनिवार असे पालिकेचे कामकाज आता येथून पुढे चालू ठेवले जाणार आहे.

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.