मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंनी तोंड सांभाळून बोलावं

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on

सातारा : काही दिवसांपूर्वी कोकणसह सातारा, कोल्हापूर, सांगलीत (Satara, Kolhapur, Sangli Flood) पावसानं थैमान माजवत पूरस्थिती निर्माण केली होती. यात नागरिकांच्या नुकसानीसह जीवित हानीही (Patan Taluka Landslide) झाली होती. मात्र, हे सगळं होत असताना ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) कोणतीच मदत दिली जात नसल्याचा आरोप सतत भाजपकडून (BJP) केला जात होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackeray) टीकेची झोड उठवली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Deputy Chief Minister Ajit Pawar) चोख प्रत्युत्तर दिलं होतं. आता या वादात गृहराज्यमंत्र्यांनी उडी घेतली असून नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. (Flood 2021 Minister Shambhuraj Desai Criticism Of Minister Narayan Rane Political News bam92)

Summary

काही दिवसांपूर्वी कोकणसह सातारा, कोल्हापूर, सांगलीत (Satara, Kolhapur, Sangli Flood) पावसानं थैमान माजवत पूरस्थिती निर्माण केली होती.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी, मंत्री नारायण राणे यांचे तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात असल्याचे म्हणत राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही आधी शिवसैनिक (Shivsena) आहोत आणि नंतर मंत्री, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंनी विचार करावा, असा इशाराही त्यांनी दिला. पक्षाकडून सांगितलं आहे, म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षानं सांगितलं, तर जशास तसं उत्तर देण्याची आमच्यात ताकद आहे, त्यामुळे राणेंनी कोणतीही भूमिका मांडताना दहावेळा विचार करावा, असा दमही देसाईंनी दिला.

Shambhuraj Desai
..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरसह सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यात कोकणासह सातारा, कोल्हापूर, सांगलीत मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या अतोनात झालेल्या नुकसानीची नुकतीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पाहणी केलीय. दरम्यान, चिपळूण दौऱ्यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलेच प्रत्युत्तरही दिले होते.

Flood 2021 Minister Shambhuraj Desai Criticism Of Minister Narayan Rane Political News bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.