महाबळेश्वर : सध्या कोविड 19 नियंत्रणात आहे परंतु गर्दीमुळे पुन्हा जर कोविडचा प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पुन्हा लॉकडाउन जाहीर करावा लागले असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर येथे बोलताना दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर महाबळेश्वर शहर विकास आराखडा आढावा संदर्भात नुकतीच बैठक झाली. या बैठकीस प्रांताधिकारी संगिता राजापुरकर, पर्यवेक्षाधिन अधिकारी मनिषा आव्हाळे, तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे काही महिन्यांपुर्वी महाबळेश्वरात आले होते. त्यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी वेण्णालेक परिसर विकास आराखडा सादर करून या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. वेण्णालेक सह महाबळेश्वरच्या विकासाचा उत्तम आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सुचना करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सुधारित विकास आराखडयास 100 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला होता. या आराखडयास लागणारा निधीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्याच्या अंदाजपत्रकात तरतुद केली होती. परंतु कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढला आणि देशात लॉकडाउन जाहीर झाले.
भोसगावची रंगीबेरंगी दुनिया यंदा कुलूपबंद; पर्यटक-अभ्यासकांची निराशा
त्यामुळे या विकास आराखडया संदर्भात काहीच हालचाली झाल्या नाहीत. परंतु आता हळू हळू सर्व पुर्वपदावर येत आहे. महाबळेश्वरचा विकास आराखडयावर काम सुरू झाले आहे. तेव्हा या संदर्भात काही सुचना असतील तर सांगा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या नगरसेवकांना व व्यापा-यांना केली.
जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरचे पॉईंट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी केली तसेच याचा पाठपुरावाही चालु ठेवला येथील घोडे व्यवसायिक, टॅक्सी संघटना, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक यांनीही मागणी केली आहे. आता लवकरच दिवाळी हंगाम सुरू होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेवुन येत्या दोन दिवसांत पॉईंट सुरू करण्यास परवानगी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. महाबळेश्वर येथे पर्यटनवाढी पेक्षा पर्यटकांना ज्या सोई सुविधा मिळतात त्याच्या दर्जात वाढ करण्याची गरज आहे असल्याचे मत बहुतांश सदस्यांनी व्यक्त केले.
मराठा समाजाच्या लढ्याला यश येण्यासाठी आपण सर्वजण एकत्र लढले पाहिजे अशी खंत खूद्द राजेंनीच व्यक्त केली
विविध पॉइंटवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे संरक्षक कठडे असले पाहिजेत. त्याठिकाणी स्वच्छता गृह, प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, वाहन लावण्यासाठी जागा, पॉईंटचे नामफलक व माहिती फलक असावे, खासगी बससाठी वाहनतळ मिळावा अशा मागण्याही यावेळी नगरसेवकांनी केल्या. याचर्चेत नगरसेवक किसनराव शिंदे, प्रकाश पाटील, विमल पार्टे यांनीही सहभाग घेतला. यावेळी नगरसेविका विमल ओंबळे, शारदा ढाणक, सुनिता आखाडे, श्रध्दा रोकडे, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे, जावली बाजार समितीचे दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला 'ब' वर्ग दर्जा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.