कऱ्हाड (सातारा) : वाघासह बिबट्याच्या नख्यांची (Tiger Nails) तस्करी करणाऱ्या संशयिताच्या घर, दुकानावर वन विभागाने (Karad Forest Department) टाकलेल्या छाप्यात आणखी नऊ नखे जप्त केली आहेत. या नखांची अधिकृत तपासणी प्रयोगशाळेत होणार आहे. त्यासाठी आज सापडलेली नखे प्रयोगशाळेत पाठवली आहेत. तेथील अहवालानंतर नखे कोणत्या श्वापदाची आहेत, ते स्पष्ट होईल. संशयित अनुप रेवणकरच्या गोल्ड स्मिथ दुकानातून वन विभागाने ही नखे जप्त केली.
वन विभागाने आजअखेर संशयितांकडून वाघ, बिबट्याची ११ नखे जप्त केली आहेत.
वन विभागाने आजअखेर संशयितांकडून वाघ, बिबट्याची ११ नखे (Leopard Nails) जप्त केली आहेत. तस्करीत कर्नाटकसह (Karnataka) तमिळनाडू (Tamil Nadu) येथील टोळीचा सहभाग असण्याची शक्यतेने वन विभागाच्या दोघांचे पथक रवानाही झाले आहे. कर्नाटकातील शिमोगा येथील एका टोळीचे दोघांशी लागेबांधे आहेत, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. या प्रकरणी दिनेश बाबूलाल रावळ (वय ३८, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) व अनुप अरुण रेवणकर (वय ३६, रा. रविवार पेठ, सातारा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याची ११ नखे जप्त झाली आहेत.
नखे खरेदी करण्याच्या बहाण्याने दिनेश रावलला वन विभागाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन नखे, तर त्याच्याकडील चौकशीत निष्पन्न झालेल्या रेवणकरकडून नऊ वाघ नखे जप्त झाली. वन अधिकारी महेश झांजुर्णे, तुषार नवले व रमेश जाधववर यांच्या नेतृत्वाखाली रेवणकरच्या दुकानात छापा टाकला. त्यातही आणखी नऊ नखे जप्त झाली. मात्र, ती नखे नेमक्या कोणत्या श्वापदांची आहेत, त्याची खात्री नसल्याचे तुषार नवले यांनी सांगितले. दरम्यान, दिनेश रावल व अनुप रेवणकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने त्यांना आणखी तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.