कऱ्हाड : जगभरात मंकी पॉक्स व्हारयस जगभरात पसरतो आहे. तो पाकीस्तानात शिरला आहे. त्यामुळे हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर प्रोटोकॉल लागू करावा. मुंबई विमानतळावर चाचणी आणि विलगीकरण सुविधांची अंमलबजावणी उच्च संसर्ग असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी केली जावी, अशी मागणी माजी मुख्यंमत्री आमदार पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात अशी आग्र्रही मागणी केली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं काढता पाय घेतला असतानाच मंकी पॉक्स नावाच्या नव्या आजारानं डोकंवर काढले आहे. त्याचा जगभरात थैमान घातले आहे. तब्बल ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. मंकी पॉक्सच्या प्रकोपामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणीही जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच, जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ते पत्रही ट्वीट करून त्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटलं आहे की, मंकी पॉक्स विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोचला आहे. हाय रिस्क देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
आमदार चव्हाणांच्या पत्रात काय आहे...
मंकीपॉक्स व्हायरसच्या वाढत्या धोक्याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी पत्र लिहित आहे. अलीकडेच देशासमोर कोविड-१९ व्हायरस सोबत लढण्याचं मोठं आव्हान आहे. लाखो कोविड योद्ध्यांच्या अथक आणि निस्वार्थ प्रयत्नांमुळे त्या संकटावर मोठ्या खर्चाने मात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अलिकडेच मंकी पॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. आफ्रिकेत उगम झालेला व्हायरस वेगानं पसरतो आहे. मंकीपॉक्स पाकिस्तानात पोचला आहे. देशात त्याचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलावीत, अशी आग्रही विनंती करतो. ती गोष्ट लक्षात घेऊन, मी शिफारस करतो की, मुंबई विमानतळावर चाचणी आणि विलगीकरण सुविधांची अंमलबजावणी उच्च संसर्ग असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी केली जावी. कोविड- १९ दरम्यान योग्य काळजी घेतली नव्हती. वेळेवर काळजी घेणे महत्वाचं आहे. कारण एखाद्या संक्रमित व्यक्तीचा शोध न घेता त्याला देशात येऊ दिल्यास, गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.