'बदनामी करण्याच्या हेतूनं माझ्याविरुध्द भाजपचं षडयंत्र'

Anil Jagtap
Anil Jagtapesakal
Updated on
Summary

'भाजपच्या मंडळींनी राजकीय द्वेशातून बदनामी करण्याच्या हेतूनं माझ्या विरोधात रचलेलं हे षडयंत्र आहे.'

वाई (सातारा) : पंचायत समितीचे (Panchayat Committee) सदस्यत्व रद्द झाल्यासंदर्भात विभागीय आयुक्तांचे पत्र एक डिसेंबरला मिळाले. मी वेळेवर घरपट्टी भरली होती; परंतु गावातीलच भाजप (BJP) विचाराच्या मंडळींनी राजकीय आणि व्यक्ती द्वेशातून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या विरोधात रचलेले हे षडयंत्र आहे, असे माजी उपसभापती अनिल जगताप (Anil Jagtap) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, की घरपट्टी भरणे मला अशक्य नाही; परंतु घरपट्टीची नोटीस मिळाली नाही. घरपट्टी थकबाकीबाबत लोकन्यायालयाची नोटीस आल्यानंतर त्वरित थकबाकी जमा केली होती. प्रवीण जगताप व प्रदीप क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) सत्ता ताब्यात असताना तत्कालीन ग्रामसेवक बाळासाहेब कोचळे यांना हाताशी धरून माझ्या विरोधात षडयंत्र रचून हे कृत्य केले आहे. उपसभापती असताना ग्रामसेवक कोचळे याने ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार केल्याच्या अनेक ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची शहानिशा केल्यानंतर ग्रामसेवक कोचळे याने अनेक गैरव्यवहार केल्याचे दिसून आल्याने आपण त्याच्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या वेळी त्याने नोकरी जाईल म्हणून गयावया केल्याने तक्रार मागे घेऊन आपण पुढील कार्यवाही थांबवली होती.

Anil Jagtap
'औरंगजेबनं 400 हून अधिक मंदिरांसाठी जमीन केली होती दान'

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. या वेळी झालेला दारुण पराभव सहन न झाल्याने प्रवीण जगताप व प्रदीप क्षीरसागर यांनी या ग्रामसेवकाला हाताशी धरून माझ्या विरोधात कट कारस्थान केले. आयुक्तांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केवळ आकसापोटी तत्कालीन ग्रामसेवकाला हाताशी धरून अनिल जगताप यांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीचा केंजळ ग्रामस्थ निषेध करीत आहेत. सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, सदस्य नीलेश जगताप यांनीही आपली मते मांडली. या वेळी अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Anil Jagtap
'मी भाजपात प्रवेश केला नाही म्हणून मला तुरुंगात टाकलं'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.