Maratha Reservation लढाईत आम्हाला साथ द्यावी; हर्षवर्धन पाटील उदयनराजेंच्या भेटीला

Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Updated on

विसापूर (सातारा) : सध्या मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलं तापलं असून केंद्र व राज्य सरकारविरोधात मराठा समाजात रोष वाढत आहे. सुप्रिम कोर्टानं (Supreme Court Order) मराठा आरक्षणासंदर्भात याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाज आणखी आक्रमक होत सरकारवर टीकेची झोड उठवलीय. त्यातच भाजपने देखील सरकारच्या उदासिन भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलीय. त्याच अनुषंगाने आज सातारा दौऱ्यावर असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) यांनी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेत मराठा आरक्षणावर चर्चा केली, यावेळी त्यांनी उदयनराजे यांच्या समोर आरक्षणप्रश्नी काही मुद्दे मांडले. यावरती लवकरच आपण तोडगा काढून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटलांना दिले. (Former Minister Harshvardhan Patil Meets MP Udayanraje Bhosale At Jalmandir Palace Regarding Maratha Reservation)

Summary

सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं असून केंद्र व राज्य सरकारविरोधात मराठा समाजात रोष वाढत आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले होते. हायकोर्टाने ते आरक्षण योग्य असल्याचा निर्णय दिला होता. सुप्रिम कोर्टात याविरुद्ध याचिका दाखल झाली. नेमकी याचिकेवर सुनावणी न झाल्याने तसेच सध्याच्या सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण पुन्हा रद्द झाल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. सध्याचा लॉकडाऊन संपल्यावर सर्वांना बरोबर घेऊन मराठा आरक्षणाची कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढणार आहोत. सर्वच समाज बांधवांनी या लढाईत आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुसेगाव (ता. खटाव) येथे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण आणि भविष्यात लढायची आरक्षणाची लढाई याविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, सेवागिरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रणधीर जाधव, माजी सरपंच ॲड. श्रीकृष्ण जाधव, राहुल पाटील, टी. एन. जाधव, अंकुश पाटील, रोहन देशमुख, विविध गावचे सरपंच आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Maratha Reservation
फलटण-म्हासुर्णे रस्त्याची 'Limca Book'मध्ये नोंद; बांधकाम मंत्र्यांकडून विशेष कौतुक

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, २०१३ साली मिळालेले मराठा आरक्षण रद्द झाले. त्यानंतर शांततेच्या मार्गाने मराठा समाजाची रेकॉर्डब्रेक आंदोलने झाली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टाने ते आरक्षण योग्य असल्याचा निर्णय दिला होता. सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आत्ताच्या सरकारने युक्तीवाद करण्यासाठी कनिष्ठ वकील पाठवले. न्यायालयाने मराठीमधील कायदा इंग्लिशमध्ये भाषांतरीत करुन देण्याचे आदेश दिले. त्यासाठी सरकारने चार महिने वेळ घेतला. प्रकरण न्यायालयात असल्याने सध्याचे कॅबिनेट मंत्रीमंडळ शांत राहिले. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर युक्तीवाद न होता विविध समित्यांच्या निकषांवर झाला. लार्जर बेंचमध्ये आरक्षण नाकारलेले न्यायाधीश होते. सध्याचे सरकार बाजू मांडण्यात कमी पडले. ५० टक्क्यांवरील आरक्षण केंद्राकडे नसून राज्यांकडे आहे. एकदा दिलेले आरक्षण पुन्हा काढून घेणे चुकीचे आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता माराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पाटील पुढे म्हणाले, सरकारवर दबाव वाढविण्यासाठी लॉकडाऊन संपल्यावर सर्वांना बरोबर घेऊन आपण मराठा आरक्षणाची कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढणार आहोत. इतर समाजांना आरक्षण देताना मराठा समाजाने साथ दिली होती. आता इतर समाजांनी मराठा समाजाच्या पाठिशी रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Maratha Reservation
रुग्णालय खासगी संस्थेला दिल्यास माझ्याशी गाठ; खासदार रणजितसिंहांचा रामराजेंना इशारा

आता मराठा समाज हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरेल

आजपर्यंत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाने शांततेत आंदोलने केली, मोर्चे काढले. आता आमचा संयम संपत चालला आहे. यापुढे आमचा समाज रस्त्यावर हातात दांडकी घेऊन उतरेल, तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल. लोकशाहीत संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. मराठा समाज आता टोकाचा संघर्ष करायला एका पायावर तयार आहे. सरकारने शिक्षणात गुण आणि नोकऱ्यांमध्ये गुणवत्ता हेच निकष लावावेत. सर्वाधिक उपेक्षित मराठा समाजासाठी मराठा नेत्यांनी काहीच केले नाही अशा संतप्त भावना ॲड. श्रीकृष्ण जाधव, टी. एन. जाधव, अंकुश पाटील यांनी व्यक्त केल्या.

Former Minister Harshvardhan Patil Meets MP Udayanraje Bhosale At Jalmandir Palace Regarding Maratha Reservation

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()