पोलिस बंदोबस्तात माजी आमदार कोठडीतून थेट मतदान केंद्रावर

Prabhakar Gharge
Prabhakar Ghargeesakal
Updated on
Summary

मतदारसंघात घार्गेंविरुध्द नंदकुमार मोरे यांच्यात लढत होत असल्याने मतदान केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

वडूज/निमसोड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) खटाव सोसायटी मतदारसंघातील (Khatav Society Constituency) अपक्ष उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे (Former MLA Prabhakar Gharge) यांनी आज पोलिस बंदोबस्तात आज थेट कोठडीतून येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सोसायटी मतदारसंघात श्री. घार्गेंविरुध्द सहकार पॅनेलचे उमेदवार नंदकुमार मोरे यांच्यात लढत होत असल्याने मतदान केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Prabhakar Gharge
'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. माजी आमदार श्री. घार्गे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रावर हजर राहण्याची त्यांना न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोचले. घार्गे यांच्या वतीने माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी सभापती मानसिंगराव माळवे, इंदिरा घार्गे, प्रीती घार्गे, प्रिया घार्गे तसेच घार्गे समर्थक मतदान केंद्र परिसरात ठाण मांडून होते.

Prabhakar Gharge
जावळीत शरद पवार, अजित पवारांनी स्वतः घातलं लक्ष; आमदार शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

तालुक्याच्या अस्मितेसाठी लोक एकत्र

लोकांना न पटणारा अन्यायकारक निर्णय येथील जनतेने कधी स्वीकारला नाही, हा अनेक दशकांचा इतिहास आहे. गेल्या २० वर्षांत आपण तालुक्यातील सहकार क्षेत्राला उभारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. साखर कारखाना, कोल्ड स्टोअरेजची उभारणी केली, असे नमूद करून प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘‘निवडणुकीत यश-अपयश येते. मात्र, निवडणूक झाल्यानंतरही आपण कधी हा आपला, हा परका असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन काम केले. मागून वार करण्याची प्रवृत्ती कधीही स्वीकारली नाही. उलट जे आहे ते स्पष्ट या भावनेने काम केले. डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख आदींनी सहकार्याची भूमिका घेतली. तालुक्याची अस्मिता म्हणून लोक एकत्र आले आहेत.’’

Prabhakar Gharge
माजी आमदारांनी थेट गाडीतूनच बजावला मतदानाचा अधिकार; जाणून घ्या कारण

पप्पा, तुम्हीच आमची बँक...

सुमारे तीन महिन्यांपासून कोठडीत असलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे हे वडूज येथे आज पत्नी इंदिरा व कन्या प्रीती घार्गे यांना भेटले. त्यावेळी कडकडून भेटल्यानंतर ‘आम्हाला काहीही नको. पप्पा, तुम्हीच आमची बँक आहात,’ असे भावनिक उद्‌गार प्रीती यांनी काढले. त्यावेळी काही काळ उपस्थित स्तब्ध झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.