सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात 365 रुग्ण बाधित आढळले असून, चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
मागील महिनाभरापासून जिल्ह्यात 250 ते 350 च्या जवळपास बाधित रुग्ण आढळत आहेत, तरीदेखील शहर व उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त
दरम्यान, जिल्ह्यात उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने 324 नागरिकांना घरी सोडण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात रांजणवाडी (ता. सातारा) येथील 67 वर्षीय महिला, गोरेवाडी (ता. सातारा) येथील 75 वर्षीय पुरुष, तसेच विविध रुग्णालयांत गोळीबार मैदान सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पांढरवाडी (ता. वाई) येथील 71 वर्षीय पुरुष अशा एकूण चार बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
आदेशाचा भंग केल्याने साताऱ्यातील चार हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हे
शनिवार (ता.27) अखेर काेविड 19 ची एकूण संख्या
एकूण नमुने : 3,95,293
एकूण बाधित : 63,739
घरी सोडण्यात आलेले रुग्ण : 59,307
मृत्यू : 1,893
उपचारार्थ रुग्ण : 2,539
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.