सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी चार जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी येथील जिल्हा परिषद चौकातील नेशन 11 या हॉटेलवर कारवाई करत केतन भिकू कदम (रा. बॉंबे रेस्टॉरंट चौक) याच्यावर गुन्हा नोंदविला.
याचदरम्यान विसावा नाका येथील प्रगती चायनीज या हॉटेलवर कारवाई केली. याप्रकरणी सतीश सुरेश फरांदे (रा. सदरबझार) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोडोली चौकात असणाऱ्या विसावा चायनीज या ठिकाणावर सातारा शहर पोलिसांनी, तसेच वडूथ (ता. सातारा) येथील सेव्हन स्टार हॉटेलवर सातारा तालुका पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. याप्रकरणी सनी संजय भिसे (रा. एमआयडीसी, सातारा) याच्यावर सातारा शहर, तर सचिन विश्वासराव निकम (रा. वडूथ) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राजवाडा येथून दुचाकी चोरीस
सातारा : राजवाडा येथील भाजी मंडईच्या पार्किंगमधून चोरट्यांनी काल 30 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याची तक्रार चंद्रकांत नारायण आवळे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. तपास महिला कर्मचारी घोडके करीत आहेत.
अपहरणप्रकरणी युवकावर संशय
सातारा : राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी वाळवा (जि. सांगली) येथील प्रतीक पाटील या युवकावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची तक्रार अपहृत युवतीच्या नातेवाइकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली असून, संशयित पाटील याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याचा तपास हवालदार काशीद करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात काेठे काेठे लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे जाणून घ्या
गोडोलीतून सायकल चोरीस
सातारा : गोडोली येथील आझादनगरमधील पद्मावती रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या हेमलता धनाजी फडतरे यांची सहा हजार रुपये किमतीची सायकल चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यात चोरून नेली. याची तक्रार फडतरे यांनी काल सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. याचा तपास हवालदार जाधव करीत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.