विनामास्क फिरणा-या व्यापाऱ्यांना तांबवेत ठोठावला चार हजार दंड

विनामास्क फिरणा-या व्यापाऱ्यांना तांबवेत ठोठावला चार हजार दंड
Updated on

तांबवे (जि. सातारा) : येथे दोन कोरोनाबाधित सापडल्याने ग्रामपंचायतीने आक्रमकपणे उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील आठवडा बाजारात ग्रामपंचायतीच्या वतीने विनामास्क आलेल्या व्यापाऱ्यांना तब्बल चार हजारांचा दंड वसूल केला.

जिल्ह्यातील पहिला रुग्ण तांबवे गावात सापडला होता. त्याला एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी येथे पुन्हा कोरोनाबाधित दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्‍यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 

गावामध्ये विनामास्क फिरणारे, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचीही मोहीम ग्रामपंचायतीच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र, ज्यांनी मास्क लावले नव्हते अशा व्यापाऱ्यांवर उपसरपंच ऍड. विजयसिंह पाटील, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, कर्मचारी संजय राऊत, दिनेश मोगरे, विकास पाटील, सुभाष मदने यांनी संबंधितांकडून चार हजारांचा दंड वसूल केला. ग्रामपंचायतीने अचानक केलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली.

पक्ष मजूबत करा; राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांकडून सदस्यांची कानउघडणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()