VIDEO : काळ आला होता, पण..; तापोळा मार्गावरील पुलाला अचानक भगदाड पडले अन् गाडी चक्क भगदाडात घुसून अडकली

'काळ आला होता, पण फोन वेळ आली नव्हती' हीच म्हण सत्यात उतरताना दुर्गम तापोळा भागात आज घडली.
Tapola Mahabaleshwar Road
Tapola Mahabaleshwar Roadesakal
Updated on
Summary

गाडी देवळी गावच्या ओढ्यावर आली असता, ओढ्यावर असलेल्या जुन्या पुलावरून जाताना अचानकच पुलाला भगदाड पडून गाडी तोंडाकडून आत भगदाडात गेली.

कास : 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' हीच म्हण सत्यात उतरताना दुर्गम तापोळा भागात आज घडली. चक्क पुलाला अचानक भगदाड पडल्याने पुलावरील गाडी त्या भगदाडात तोंडाकडून अर्धी घुसून अडकल्याने आतील दोन प्रवासी वाचले.

मुसळधार पावसाने खाली धो धो वाहणारे पाणी काळजाचा ठोका चुकवत होते. अशा परिस्थितीत जर गाडी खाली पडली असती तर गाडी वाहून जाण्याचा धोका होता. याबाबत सविस्तर वृत्त असे, की तापोळा भागातील तापोळा-कळमगाव-देवळी रस्त्यावरून वेळापूरचे आनंद सपकाळ आपल्या पत्नीसह खासगी वाहनातून मुंबईकडे निघाले होते. गाडीतून दोघेच प्रवास करत होते.

Tapola Mahabaleshwar Road
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे का? 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

गाडी देवळी गावच्या ओढ्यावर आली असता, ओढ्यावर असलेल्या जुन्या पुलावरून जाताना अचानकच पुलाला भगदाड पडून गाडी तोंडाकडून आत भगदाडात गेली. नशीब चांगले म्हणून गाडी निम्यावरच अडकली. पुढील सीटवरून आनंद सपकाळ आणि पत्नी दोघेही गाडीतून मागच्या सीटवर जात गाडीतून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी देवळी गावात जाऊन सदर घटनेची माहिती दिली.

Tapola Mahabaleshwar Road
US Woman Sindhudurg: भयंकर! कोकणातील जंगलात अमेरिकन महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत सापडली; ४० दिवस अन्नपाण्याविना विना..

गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, बाबुराव जाधव, जेसीबी चालक आकाश जाधव व इतर ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली. गाडी बाहेर काढणे अवघड काम असल्याने सुदैवाने काही कामानिमित्त आलेला जेसीबी गावातच उपलब्ध झाला. सदर जेसीबीला व गाडीला दोर बांधून गाडी तोंडाकडून अलगद उचलून काढण्यात यश आले. सदर घटनेत गाडीचे नुकसान झाले असले तरी आतील सपकाळ कुटुंबीय सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

मोठ्या प्रमाणात पुलाचा भराव खराब

सदर पूल दगडी कमानीचा अत्यंत जुना असा असून मोठ्या प्रमाणात पुलाचा भराव खराब झाला आहे. व खालची कमान ही धोकादायक बनलीये. त्यामुळे सदर पुलाची दुरूस्ती तात्काळ करण्याची गरज आहे. सदर रस्ता प्रतापगडावरून सुरू होवून प्रतापगड, वाड्यावरून पार चतुरबेट, दूधगाव, झांजवड, देवळी, कळमगाव, कोट्रोशी, आमशी, हरचंदी, वेळापूर, पाली, उतेकर वाणवली ते तापोळा अशा गावांदरम्यान वाहतुकीसाठी वापरला जात असून साधारणतः पंचवीस ते तीस गावे सदर रस्त्यावर अवलंबून आहेत.

प्रतापगड ते तापोळा मार्ग 17 कि.मी 27/400 मधील अतिशय जुन्या कमानी पुलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे खचला आहे, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजच तात्पुरत्या स्वरूपात पाइप टाकून भराव करून वाहतूक चालू केली जाईल.

-अजय देशपांडे, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग, महाबळेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.