नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार खरंय; आणायला जाण्यापुर्वी हे वाचा

नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार खरंय; आणायला जाण्यापुर्वी हे वाचा
Updated on

सातारा : कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात रेशनवरील धान्य काही लाभार्थ्यांना मोफत तर एपीएलच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात तांदूळ, गहू आणि चना डाळ दिली जात होती; परंतु आता केशरी, तसेच कोणतेही रेशनकार्ड नसलेल्यांसाठीची आत्मनिर्भर योजना बंद झाली आहे. त्यामुळे सध्यातरी केशरी व रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य मिळणार नाही, तसेच ज्यांच्या रेशनकार्डची ऑनलाइन नोंद झालेली आहे, अशाच लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
भिवा भदाणेचा तेरावा
 
कोरोना विषाणू महामारीच्या काळामध्ये शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य उपलब्ध केले होते. सुरवातीचे तीन ते चार महिने सर्वच लोकांनी रेशनवरील धान्य नेले. शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचे मोफत वाटप करण्यात आले, तसेच केशरी कार्डधारक ज्यांची ऑनलाइन नोंदणी आहे, अशा लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ देण्यात आले.

अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या दोन्ही भावांच्या निधनाची कल्पना नाही, सायरा यांनी सांगितलं कारण

सुरवातीला शासनाने ऑगस्टपर्यंतची मोफत, तसेच सवलतीच्या दरात रेशनवरील धान्य उपलब्ध केले. गरीब कल्याण योजनेतून साधारण तीन लाख 92 हजार 45 लाभार्थ्यांना 5150.37 मेट्रिक टन गहू व 29110.46 मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे, तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत चार महिन्यांत एकूण चार लाख पाच हजार 302 शिधापत्रिकाधारकांना 21640.19 मेट्रिक टन गहू, तसेच 13801.2 मेट्रिक टन तांदळाचे वाटप केलेले आहे.

अभिनेत्री अश्‍विनी महांगडेंनी साधला भिक्षेकऱ्यांशी संवाद

आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सातारकराचा झेंडा 
 
आता शासनाने मोफत धान्याची योजना पुढे नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांची ऑनलाइन नोंदणी असलेल्या रेशनकार्डधारकांना धान्य मिळणार आहे; पण केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात मिळणारे धान्य या महिन्यापासून बंद झाले आहे. त्यामुळे केशरी कार्डधारकांची नोंदणी असेल तरच धान्य मिळणार आहे. यासोबतच ज्यांचे कोणतेच कार्ड नाही, अशा धारकांसाठी कोरोना लॉकडाउनच्या काळात शासनाने आत्मनिर्भर योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत कोणतेच कार्ड नसलेल्या सर्वांना धान्य दिले जात होते. यामध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो चना डाळ मोफत दिली जात होती. ही योजना 31 तारेखला संपली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना आता शासनाकडून सवलतीचे धान्य मिळणार नाही. 

भारीच की! बटाटा संशोधन केंद्रामुळे शेतक-यांचे आर्थिक बजेट सुधारणार

जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा इष्टांक 100 टक्के पूर्ण झाला आहे. त्यामुळे आम्ही आणखी एक लाखभर रेशनकार्ड वाढवून देण्यासाठीची परवानगी शासनाकडे पत्राद्वारे मागितली आहे. 
स्नेहा देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.


व्यावसायिक वाहनधारकांचा फायनान्स कार्यालयावर मोर्चा

माजगावला उरमोडी नदीत आढळला महिलेचा मृतदेह

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.