Satara News : जिल्ह्याला सैनिकी सेवेच्या परंपरेची पार्श्वभूमी इतिहास काळापासूनच आहे. स्थलसेना, नौसेना व वायुसेना या तिन्ही दलांमध्ये जिल्ह्यातील कार्यरत सैनिक, अधिकाऱ्यांची व माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे.
नौदलातून निवृत्त झालेल्या अशाच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवृत्तीनंतरही द सातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याद्वारे देशसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. नौदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पत्नींसाठीही त्यांचे बचत गटाच्या माध्यमातून काम सुरू आहे.