सातारा : ‘फ्रॉम नथिंग टू समथिंग ॲण्ड प्लॅनिंग टू अचिव्ह मोअर’ हे शब्द जर साताऱ्याच्या मातीत उभ्या राहिलेल्या अजिंक्य इलेक्ट्रो सिस्टिम्सच्या प्रवासाबद्दल वापरले तर काही वावगे ठरणार नाही. उद्योजक होण्यासाठी उद्योजक पार्श्वभूमीच लागते, हा समज खोडून काढत सुनील शिंदे व अनिल जाधव या दोन युवकांनी २००७ मध्ये सातारा औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची स्थापना केली. २००७ मध्ये फुटलेला हा अंकुर आपल्या ज्ञानाच्या व मेहनतीच्या जोरावर आज साताऱ्यासोबतच पुणे व कऱ्हाडमध्येही कार्यरत आहे.
अजिंक्य इलेक्ट्रो सिस्टिम्सचे सुनील शिंदे व अनिल जाधव यांचा हा प्रवास खरोखरच युवकांना प्रेरणा देणारा आहे. सुनील शिंदे हे देगावचे तर, अनिल जाधव हे कोडोलीचे. औद्योगिक वसाहत त्यांच्याच गावात उभी राहिली आहे. संजय भापकर, रवींद्रनाथ जाधव व ‘मास’चे अध्यक्ष नाना देशमुख यांनी हा व्यवसाय उभा करताना नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्याचे श्री. शिंदे सांगतात. या प्रेरणेतूनच त्यांनी इलेक्ट्रिकल कन्ट्रोल पॅनल डिझाईन करायला सुरवात केली. २००७ मध्ये त्यांनी सुवर्ण लघु उद्योजक योजनेतून सातारा औद्योगिक वसाहतीत जागा घेतली. त्यात अजिंक्य इलेक्ट्रो सिस्टिम्स नावाची कंपनी सुरू केली. त्यांनी आज ग्राहकांसाठी एकाच छताखाली इलेक्ट्रिकलच्या कामासंदर्भात सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. कन्स्ट्रक्शन मशिन्स इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, ऑइल ॲण्ड गॅस, साखर कारखाने, हॉस्पिटल, हॉटेल्स तसेच यांसारख्या क्षेत्रांमध्ये लागणारे सर्व PCC, MCC, PLC, VFD, AMF, DG Synchronization, SPM, APFC अशा सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक पॅनल्सचे ते मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत. फॅब्रिकेशन, पावडर कोटिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग या सर्वांसाठी लागणारे मॅन्युफॅक्चरिंग सेटअप त्यांच्याकडे आहे.
कठोर परिश्रम व मेहनतीच्या जोरावर चार वर्षांतच त्यांची कंपनी ‘आयएसओ’ नामांकित झाली. सर्व सेटअप इनहाउस असल्यामुळे तसेच कंपनी ‘आयएसओ’ नामांकित असल्यामुळे ग्राहकांना त्यांचे प्रॉडक्ट गुणवत्ता आणि वेळेच्या मर्यादेमध्ये डिलिव्हरी करतात. त्याचसोबत त्यांचे क्रॉम्प्टन ग्रिव्हज या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ड्राईव्हज व ॲटोमोशन (VFD) डिव्हिजनचे पश्चिम महाराष्ट्रचे अधिकृत चॅनल पार्टनर्सही ते आहेत. गेल्या १५ वर्षांमध्ये संपूर्ण भारतभर असणाऱ्या ग्राहकांना आपल्या प्रॉडक्ट आणि सेवेने त्यांनी खुश केले आहे. त्यातून त्यांनी पुणे व तासवडे (कऱ्हाड) येथेही आपल्या कंपनीचे युनिट उभे केले आहे.
‘बेस्ट उद्योजक’ पुरस्काराने सन्मान
कठोर मेहनत, सचोटी व गुणवत्ता या जोरावर अजिंक्य इलेक्ट्रो सिस्टिम्सची सुनील शिंदे व अनिल जाधव या मित्रांनी अजिंक्य इलेक्ट्रो सिस्टिम्सची उभारणी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल ‘मास’च्या पहिल्या प्रदर्शनात घेण्यात आली. या प्रदर्शनात त्यांना ‘बेस्ट उद्योजक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.