वाई पालिकेत स्वच्छतेवरून मुकादम धारेवर

मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या उपस्थितीत पालिकेची विशेष सभा पार
Wai Nagarpalika
Wai Nagarpalika sakal
Updated on

वाई : पालिकेच्या विशेष सभेत आज विविध विकासकामांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा दोन ते चार टक्के कमी दराच्या सर्व निविदा आल्याने या वेळी सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कोरमअभावी सभा एक तास उशिरा सुरू झाली. त्यापूर्वी शहरातील स्वच्छतेच्या कामकाजातील दिरंगाईबद्दल नगराध्यक्ष व उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित मुकादमांना धारेवर धरले.

नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या उपस्थितीत पालिकेची विशेष सभा पार पडली. सकाळी ११ वाजता सुरुवातीला मोजकेच सदस्य उपस्थित राहिल्याने सभा काही काळ तहकूब करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सावंत यांनी असान अॅप्सवर शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांनी अपलोड केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, तसेच योग्य ती कार्यवाही केली जात नाही. शहर कचराकुंडी मुक्त करण्यात आले आहे, तरीही त्याठिकाणी रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा दिसून येत आहे.

Wai Nagarpalika
धर्माबाद : पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

ठिकठिकाणी रस्त्यावर जुन्या गाड्या, तसेच गॅस सिलिंडरच्या गाड्या उभ्या असतात. दोन दिवसांत नवीन पुलाच्या बांधकामासाठी जुना कृष्णा पूल पाडण्यात येणार त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे. त्यावर प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आरोग्य व बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सिस्टिममध्ये काम करण्याची सवय लावून घ्यावी, अशी सूचना केली. शहरात एकाच वेळी विकासकामे सुरू असून, त्यांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. बंदिस्त गटारांमुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नवीन समस्या उभी राहिली आहे. मागील सभेत उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने सभागृहात अहवाल सादर करावा, असे विरोधी पक्ष नेते सतीश वैराट यांनी सुचविले.

पालिकेला कचरामुक्त शहर म्हणून पारितोषिक मिळाले; परंतु त्यासाठी आपण पात्र आहोत काय याबाबत आत्मचिंतन करावे, असे त्यांनी सांगितले. त्यावर राजेश गुरव यांनी आक्षेप घेतला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या पारितोषिकामुळे पालिकेला निधी उपलब्ध होणार आहे. त्यावर आपणच टीका- टिप्पणी करणे चुकीचे आहे. उलट त्यापासून प्रेरणा घेऊन शहर स्वच्छतेसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगितले. मत व्यक्तिगत असल्याचे वैराट यांनी स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडला. या वेळी भारत खामकर, महेंद्र धनवे, प्रदीप चोरगे, संग्राम पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला, तर किशोर बगुल, स्मिता हगीर, सुमेय्या इनामदार, सुनीता चक्के या महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.