Sugar factory : एफआरपी पूर्ण न करताच गाळप परवाना

शेतकरी संघटना आक्रमक  कारखाने वेळेत सुरू करण्याचे साखरआयुक्तांचे आवाहन   
Sugar Factory
Sugar Factorysakal
Updated on

सातारा : एफआरपी पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा, अशी मागणी ऊसउत्पादक व शेतकरी संघटनांतून होत आहे. मात्र, साखर आयुक्त कार्यालयाकडून धडाधड गाळप परवाने दिले जात आहेत. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्ण केली असून, उर्वरित कारखान्यांनी १२५ ते १४० रुपये अद्याप दिलेले नाहीत. जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कारखाने वेळेत सुरू करण्याचे आवाहन साखर आयुक्तांनी केले आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. आगामी आठवडाभरात साखर कारखाने मोळी टाकणार आहेत, तर साखर आयुक्तांनी १५ ऑक्टोबरपासूनच गाळप सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपी पूर्ण केली आहे. मागील देणेही काही कारखान्यांचे बाकी आहे. मागील वर्षी जादा उसामुळे व जिल्ह्यातील तीन कारखाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली होती. त्याचा कारखानदारांनी फायदा उठवत दोन तीन टप्प्यांत एफआरपीची रक्कम दिली.

मुळात कायद्याप्रमाणे एकरकमी एफआरपी १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे; पण तो नियम पाळला जात नाही. आता नव्याने सुरू होणाऱ्या हंगामाची तयारी कारखान्यांनी केली आहे. जिल्ह्यातील किसन वीर, खंडाळा व प्रतापगड हे तीन कारखाने यावेळेस सुरू होणार आहेत. त्यापैकी खंडाळा कारखान्यास गाळप परवाना मिळाला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील ऊसउत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

वाई व जावळी तालुक्यांतील किसन वीर व प्रतापगड कारखाना सुरू झाल्यास दोन्ही तालुक्यांतील उसाचा प्रश्न मिटणार आहे; पण एफआरपी पूर्ण न करताच काही कारखाने गाळप करणार आहेत. त्यांच्याविषयी साखर आयुक्त कार्यालयाची बोटचेपी भूमिका दिसत आहे. बहुतांशी साखर कारखाने हे लोकप्रतिनिधींचे आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसही उपलब्ध आहे. त्यामुळे ऊस वेळेत जाण्यासाठी कारखाने सुरू होणेही महत्त्वाचे आहे.

आकडे बोलतात...

१६ जिल्ह्यातील साखर कारखाने

८ सहकारी साखर कारखाने

८ खासगी कारखाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()