'आमच्या भावाचं काही बरं वाईट झाल्यास सरकारच जबाबदार'; आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या केसकरांची तब्येत खालावली

धनगर आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या गणेश केसकर यांची प्रकृती खालावली आहे.
Ganesh Keskar Agitation Dhangar Reservation
Ganesh Keskar Agitation Dhangar Reservationesakal
Updated on
Summary

खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी श्री. केसकर हे नगरपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करत आहेत.

लोणंद : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) उपोषणास बसलेल्या गणेश केसकर (Ganesh Keskar) यांची कालपासून प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी, तसेच खंडाळा तालुक्यातील गावोगावच्या महिला व नागरिकांनी काल दिवसभर मोठ्या संख्येने उपोषणस्थळी येऊन त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला.

आमच्या भावाच्या जीवला काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असा इशाराही महिलांनी दिला. खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी श्री. केसकर हे नगरपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करत आहेत. उपोषणाच्या १४ व्या दिवशी माजी आमदार मदन भोसले यांनी भेट घेऊन त्यांचा पाठिंबा दर्शवला.

Ganesh Keskar Agitation Dhangar Reservation
Maratha Reservation : रत्नागिरीत आढळल्या तब्बल 3.5 लाखांहून अधिक कुणबी नोंदी; दाखल्यासाठी सामंतांनी काढला तोडगा

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके- पाटील, भाजपचे खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके, रूपालीताई ठोंबरे, राहुल घाडगे, प्रदीप क्षीरसागर, प्रा. सुजित डेरे, अॅड. पुरुषोत्तम हिंगमिरे, तेजस क्षीरसागर व समाज बांधव उपस्थित होते.

Ganesh Keskar Agitation Dhangar Reservation
Prakash Ambedkar : नरेंद्र मोदींची नावालाच 56 इंच छाती, ते लोकशाहीसाठी धोकादायक आहेत; प्रकाश आंबेडकरांची टीका

दरम्यान, काल सकाळी फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने येथे येऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, प्रा. भीमदेव बुरुंगले, शंकरराव माडकर, रामभाऊ ढेकले, रेखाताई खरात, बजरंग खटके, बजरंग गावडे, कापडगावचे उपसरपंच प्रवीण खताळ, महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, वैभव खताळ, वैभव खताळ, संतोष ठोंबरे, सत्यजित खताळ, निवृत्ती खताळ आदींसह समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान, काल व आज रात्री खंडाळा तालुक्यातील विविध गावच्या महिला, मुली व युवकांनी मोठ्या संख्येने ट्रक्टर ट्रॉली, टेंपो, जीप आदी वाहनातून उपोषणस्थळी येऊन श्री. केसकर यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.

Ganesh Keskar Agitation Dhangar Reservation
Raj Thackeray : इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावा, अन्यथा परिणाम भोगा; मनसेने दिला आठ दिवसांचा अल्टिमेटम

त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सरकारने त्यांच्या मागणीची लवकरात लवकर दखल घेऊन धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी धनगडऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस त्वरित केंद्राकडे पाठवावी, अशी मागणी करून तसा आक्रोशही या वेळी उपस्थित महिलांनी केला. आमच्या भावाच्या जीवला काही बरे वाईट झाले, तर याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असा इशाराही महिलांनी दिला. प्रशासनाच्या वतीने फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले आदींनी भेट देऊन श्री. केसकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.