सातारा - पारंपरिक खेळ, सामाजिक बांधिलकी अन् पर्यावरणपूरक गणेशोत्सव सोहळा साजरा करणारे मंडळ म्हणून सातारा शहरातील शनिवार पेठेतील जय जवान गणेश मंडळ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गेल्या ६६ वर्षांपासून शहरातील प्रत्येक उपक्रमात अग्रभागी असणारे जय जवान गणेशोत्सव मंडळाचा विशेष नावलौकिक आहे. मंडळाचे वेगळे वैशिष्ट म्हणजे फायबरची मूर्ती व मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाच्या तालावर नृत्य न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जात आहे.