काशीळ (सातारा) : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) टाळण्यासाठी केल्या जात असलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) आले (अद्रक) पिकास (Ginger Crop) सलग दुसऱ्या वर्षी फटका बसला आहे. राज्यासह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद असल्यामुळे आले पिकाच्या व्यवहारावर मर्यादा आल्या असून त्यास मागणी कमी झाली आहे. गतवर्षी मार्चपासून आले पिकाची सुरू झालेली दरातील घसरण निम्म्यापेक्षा कमी झाली असून सध्या स्थानिक व्यापारी पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति गाडी या दराने आले खरेदी करीत आहेत. या दरात भांडवली खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी (Farmer) आर्थिक अडचणीत आले आहेत. (Ginger Crop Damage Due To Coronavirus Lockdown Satara Agriculture News)
राज्यात जिल्ह्यातील आले पिकाची सातारी आले म्हणून एक वेगळी ओळख आहे. सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक आले पीक घेतले जाते.
राज्यात जिल्ह्यातील आले पिकाची सातारी आले म्हणून एक वेगळी ओळख आहे. सातारा आणि औरंगाबाद (Satara and Aurangabad) जिल्ह्यात सर्वाधिक आले पीक घेतले जाते. मागील सहा ते सात वर्षांत आल्यास समाधानकारक दर मिळत असल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी सातारा जिल्ह्यात सरासरी तीन हजार हेक्टरवर आले लागवड झाल्याचा अंदाज आहे. मात्र, गेल्या वर्षी मार्चपासून देशभरात कोरोनाचे संकट सुरू झाले. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरू केल्याने मुंबई, पुणे या प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या होत्या. परिणामी, इतर पिकांबरोबर आले पिकास फटका बसला होता. वर्षभर कमी-अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती राहिल्याने आले पिकाच्या दरात घसरण होत गेली.
फेब्रुवारी व मार्चमध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाकडून पुन्हा लॉकडाउन करण्यात आले. आले पीक काढणीच्यावेळी लॉकडाउन सुरू झाल्याने दरात घसरण वेगाने होऊन निचांकी पातळी गाठली आहे. सध्या आले पिकास प्रतिगाडी (500 किलो) पाच ते साडेपाच हजार रुपये दर मिळत आहे. या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आले पिकासाठी एकरी किमान दीड ते दोन लाख रुपये भांडवली खर्च येतो. वर्षभर पीक सांभाळून मिळणाऱ्या दरातून भांडवलही निघणार नाही. आले पिकासाठी आवश्यक असणारे सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे आल्याच्या मागणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे गेले एक वर्ष दरात सुधारणा होत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. पुढील वर्षीपर्यंत कोरोनाचे संकट कमी होऊन बाजारपेठा सुरळीत होऊन आल्याची मागणी वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांकडून लागवड सुरू आहे. पूर्वमोसमी पावसामुळे पोषक वातावरण असल्याने सध्या आले लागणीस वेग आला आहे.
आंतरपीक करणारे शेतकरी अडचणीत
आले पिकाचा संभाव्य तोटा टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आल्यात आंतरपीक म्हणून उसाला प्राधान्य दिले. हा ऊस आता मोठा होऊ लागल्याने उसास भर लावावी लागणार आहे. तसेच ऊस मोठा झाल्यावर आले काढणे शक्य होणार नसल्याने हे आले काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. या शेतकऱ्यांच्या अडचणीचा व्यापाऱ्यांकडून फायदा घेत दर कमी केले जात आहेत.
Ginger Crop Damage Due To Coronavirus Lockdown Satara Agriculture News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.