Satara Accident: बापरे किती भयंकर! साताऱ्यात सेल्फी काढताना मुलगी 250 फूट दरीत कोसळली अन्... अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा VIDEO

Shocking Incident at Toseghar Sajjangad in Satara : या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या तरुणीचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
Satara Accident news
Satara Accident newsesakal
Updated on

साताऱ्यात ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका मुलीचा तोल गेला आणि ती २५० फुट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, ४० फुटावर एका झाडात अडकली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

महाबळेश्वर ट्रेकर आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे साहसी कार्य

या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. तिला साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

गंभीर दुखापत

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या तरुणीचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या भागात संततधार पाऊस सुरू असल्याने जमीन अतिशय निसरडी झाली आहे, त्यामुळे ही घटना घडली.

Satara Accident news
New Mahabaleshwar Project : नवीन महाबळेश्वर : पर्यटनाच्या शाश्‍वत वाटा

सेल्फीचा मोह आणि काळजीची गरज

ठोसेघर सज्जनगड परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे आणि सध्या पावसाच्या सरी कोसळत असल्याने अनेक पर्यटक इथे येतात. निसर्गसौंदर्यामुळे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही, मात्र काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा, एक सेल्फी जीवावर बेतू शकते. सुदैवाने, या तरुणीचे प्राण वाचले आहेत, पण सेल्फीचा मोह किती धोकादायक ठरू शकतो याचे हे उदाहरण आहे.

Satara Accident news
Satara: गमेवाडीत पर्यटन स्थळास राज्य शासनाची मंजुरी, पर्यटनाला मिळणार चालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()