'मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल, तर उदयनराजेंनाच साताऱ्यातून उमेदवारी द्या'; कोणी केलीये मागणी?

जागा कोणाला मिळेल, पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देतील? हेही अद्याप स्पष्ट नाही.
Satara LokSabha Elections
Satara LokSabha Elections esakal
Updated on
Summary

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साताऱ्याची जागा आम्हीच लढवणार, असे सांगितले आहे.

कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मागील वेळी पक्षाच्या चिन्हावर उभे राहून विजयापर्यंत पोचू न शकल्‍याची सल भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला सातारा लोकसभेची जागा लढवण्याची संधी मिळाली आणि उमेदवारासाठी शिफारस करण्याची वेळ आली तर खासदार उदयनराजे भोसले हेच भाजपचे उमेदवार असले पाहिजेत, असे माझे मत असल्याचे अतुल भोसले यांनी सांगितले.

मात्र, जागा कोणाला मिळेल, पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देतील? हेही अद्याप स्पष्ट नाही. कार्यकर्ता म्हणून खासदार भोसलेंनाच तिकीट द्यावे आणि तेच पहिली पसंती असतील, असे माझे मत असल्‍याचेही भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी व्यक्त केले.

Satara LokSabha Elections
Kolhapur Politics : 'अजून दोन टर्म मीच आमदार होणार'; पत्रकारांनी 'तो' प्रश्न विचारताच मुश्रीफांनी जोडले हात!

श्री. भोसले म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना (शिंदे गट) यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून, देशाचा प्रवाह बघून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व सहकारी महायुतीत आले. या तिन्ही पक्षात ज्या जागा ज्यांच्याकडे आहेत, त्या जागा त्यांना देण्यात याव्या. त्या जागांवर कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असे वाटत असेल तर त्या जागांची मागणी करायची, असे आहे.

Satara LokSabha Elections
Kirit Somaiya : सोनिया-राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? सोमय्यांचा ठाकरे-राऊतांवर घणाघात

महायुतीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, हे अद्याप ठरलेले नाही. सातारा लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२४ मध्‍ये पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी जे-जे काय करायचे, ते- ते करायचे अशी भारतीय जनता पक्षाची मानसिकता आहे. त्यामुळे जे पक्ष ठरवेल त्याप्रमाणे आम्ही काम करू.’’

Satara LokSabha Elections
Uday Samant : विधिमंडळ अधिवेशनात स्वतःचा रेकॉर्ड मोडीत काढत मंत्री सामंतांनी केला नवा रेकॉर्ड; असं नेमकं काय घडलं?

जे ठरेल, त्‍याप्रमाणे काम करणार

तेथे मागील वेळी खासदार भोसले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. पक्षाचे संघटन चांगले आहे. भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे भाजपला जागा मिळावी, असे आमचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साताऱ्याची जागा आम्हीच लढवणार, असे सांगितले आहे. त्यामुळे महायुतीत जे ठरेल, वरिष्ठ जे सांगतील त्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही श्री. भोसले यांनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.