कऱ्हाड (सातारा) : कोरोनाच्या (Corona) संकट काळात शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्या नियमांचे पालन करून मुस्लीम समाजाच्या (Muslim Religious) रमजान ईदची नमाज (Prayer) मशिद व प्रत्येक मोहल्यातून 25 लोकांच्या एकत्रित उपस्थितीने पाडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी केली आहे. (Give Us Permit For Prayer Muslim Religious Satara News)
श्री. पठाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे, की रमजान ईद मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्वाचा सण आहे. रमजान ईदची नमाज वर्षातील महत्वाची नमाज आहे. मात्र, शासन आदेशानुसार मुस्लिम बांधवाना ती नमाज अदा करता येणार नाही. मात्र, ती नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवाना मशिदीतून व मोहल्यातून किमान 25 लोकांना एकत्रित येवून कोरोनाचे नियम पाळून नमाज अदा करण्यासाठी परवानगी द्यावी.
धक्कादायक! उंब्रजच्या जवानाचा कोरोनानं घेतला बळी; साताऱ्यावर शोककळा
Give Us Permit For Prayer Muslim Religious Satara News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.