याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं (Excise Department) दिली.
कऱ्हाड : नारायणवाडी गावच्या हद्दीत अवैध गोवा बनावटीच्या दारूची (Goa liquor) वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं पकडला. या कारवाईत ट्रक, एक चारचाकी आणि चार मोबाईल असा 82 लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं (Excise Department) दिली.
याबाबतची माहिती अशी, रत्नागिरीहून कऱ्हाडकडे ट्रकमधून (एमएच- 50-एन- 7337) गोवा बनावटीची विदेशी दारु आणली जात असल्याची महिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार संबंधित विभागाचे निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक शरद नरळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सचिन खाडे, अजित रसाळ, भिमराव माळी, सचिन जाधव, श्रीमती मुनिजा मुल्ला यांनी नारायणवाडीजवळ संबंधित ट्रक थांबवून त्याची तपासणी केली.
त्यावेळी ट्रकमध्ये 180 मिलीच्या क्षमतेच्या एकूण 11 हजार 088 सिलबंद बाटल्या, 750 मिलीच्या 948 सिलबंद बाटल्या, बिअरचे 500 मिलीचे 2400 कॅन सापडले. त्यानंतर संबंधित पथकाने संबंधित मालासह ट्रक, पायलटींग करिता वापरलेले एक चारचाकी वाहन, गुन्ह्यातील अवैद्य मद्यसाठा लपवण्यासाठी वापलेल्या भुश्याची 45 पोती आणि चार मोबाईल संच असा 82 लाख 05 हजार 880 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रामजी चंद्रकांत होनमाने आणि मुस्ताक मुबारक नदाफ (दोघेही रा. जयभवानीगर, आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली) यांच्यासह अन्य एक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क सातारा अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास निरीक्षक संजय साळवे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.