Tomato Price : ..अखेर टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या गालावर लाली; पंधरा दिवसांपासून दरात तेजी

टोमॅटो दराने निच्चांक गाठल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता.
Tomato Prices
Tomato Pricesesakal
Updated on
Summary

शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेबरोबर मुंबई, पुणे, बेळगाव, अहमदाबाद आदी ठिकाणी पाठवत असतात.

कोपर्डे हवेली : टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी (Farmer) टोमॅटोकडे रेड गोल्ड म्हणून पाहात असतो. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच टोमॅटो दराने निच्चांक गाठल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात चांगली सुधारणा होत असून, सध्या किलोचा दर बाजारपेठेत पन्नास ते साठ रुपये मिळत असल्याने टोमॅटोने उत्पादक शेतकऱ्यांच्या गालावर लाली आल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना कमी दिवसात चांगले पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी टोमॅटो पिकाकडे बघतात. मागील तीन चार वर्षांपासून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने आणि तुलनेत दर कमी मिळत असल्याने टोमॅटो लागवड करावी का नाही अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी सापडला होता; परंतु गेल्या वर्षीच्या उन्हाळी हंगामाच्या अखेरीस टोमॅटोला बाजारपेठेत चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी मालामाल झाले होते.

Tomato Prices
Angarki Chaturthi : गणपतीपुळेला जात असाल, तर ही बातमी महत्त्वाची; समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना असणार बंदी, काय आहे कारण?

टोमॅटो पिकासाठी एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन खर्च येत असताना कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, शिरवडे, नडशी, सैदापूर, वडोली निळेश्वर, पार्ले, बधवडीसह परिसरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात टोमॅटोचे क्षेत्रात वाढ झालेली दिसते.

शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेबरोबर मुंबई, पुणे, बेळगाव, अहमदाबाद आदी ठिकाणी पाठवत असतात. सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई बाजारपेठेत टोमॅटो दरात सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसांत दहा किलोंचा दर सरासरी ऐंशी ते शंभर रुपये होता त्यात सुधारणा होऊन आजअखेर साडेपाचशे ते सहाशे रुपये दहा किलोपर्यंत जाऊन पोचला आहे.

Tomato Prices
Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याचा डिस्टिलरी परवाना निलंबित; राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांची मोठी कारवाई

सध्या दरात सुधारणा झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यात समाधान दिसून येत आहे. हंगामाच्या सुरुवातीला उष्णतेने, वादळी पावसाने मारले, तर हंगामाच्या अखेरीस दराने तारले अशीच काहीशी परिस्थिती यंदाच्या हंगामात झाली आहे.

यावर्षी कडक उन्हामुळे हंगामाच्या सुरुवातीला बाग जगवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप संघर्ष करावा लागला. यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या बागा करपल्या त्यातून वाचलेल्या बागा अवकाळी पावसामुळे उद्‌ध्वस्त झाल्या, तसेच हंगामाच्या सुरुवातीला दर कमी असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी बागा लवकर काढून टाकल्या. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोची आवक थंडावली. परिणामी सद्यःस्थितीत टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याचे दिसते. त्यामुळे सध्या दराची परिस्थिती चांगली आहे.

-अविनाश डुबल, टोमॅटो उत्पादक शेतकरी, वडोली निळेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.