तहसिलदारांचे चेकबुक चोरुन शासकीय कर्मचा-याने लाटले लाखाे रुपये

तहसिलदारांचे चेकबुक चोरुन शासकीय कर्मचा-याने लाटले लाखाे रुपये
Updated on

सातारा : निवडणूक कालावधीत सातारा तहसिलदारा कार्यालयात कार्यरत असताना सातारा तहसिलदारांचे चेकबुक चोरत त्यावर बनावट सह्या करुन शासकीय खात्यातील 13 लाख 65 हजारांची रोकड लांबवल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी म्हणुन कार्यरत असणाऱ्यावर शनिवारी (ता. तीन) रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रमेश जामु बसावे (पुर्ण पत्ता नाही) असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागात रमेश बसावे हे कार्यरत होते. मध्यंतरीच्या काळात निवडणूक कामकाजासाठी बसावे याला सातारा तहसिलदार कार्यालयात नियुक्‍त करण्यात आले. निवडणूक व इतर निधीच्या आणि खर्चाच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी सातारा तहसिलदार कार्यालयाच्या वतीने बसावे याच्याकडे सोपविण्यात आली होती. यासाठी सातारा तहसिलदार यांच्या नावे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये शासकीय खाते आहे. या खात्यातील व्यवहारासाठी बॅंकेच्या वतीने सातारा तहसिलदार यांना चेकबुक देण्यात आले होते. या चेकच्या आधारे सर्व आर्थिक व्यवहार पुर्ण करण्यात येतात. याठिकाणी कार्यरत असताना बसावेने सातारा तहसिलदारांचे शासकीय चेकबुक चोरले.

शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचे बायोमायनिंग प्रकल्पाविरोधात आंदोलन 

चोरलेल्या चेकबुकमधील तीन चेक बसावे याने स्वत:कडे ठेवले. नंतर सातारा तहसिलदारांच्या शिक्‍क्‍यांचा गैरवापर करत तसेच त्यांची खोटी सही करत बसावेने 12 जून ते 29 सप्टेंबर या कालावधीत स्वत:च्या खात्यात दोन वेळा तर एका मित्राच्या खात्यात अशी तीननवेळा 13 लाख 65 हजारांची रोकड वर्ग केली. हि रक्कम वर्ग केल्यानंतर स्वत:च्या तसेच मित्राच्या खात्यातून ती रक्कम बसावे याने काढून घेतली.
 
बॅंक ताळेबंदाच्या आधारे दैनंदिन आर्थिक व्यवहार तपासताना सातारा तहसिलदार कार्यालयास बसावे आणि एका अनोळखी व्यक्‍तीच्या खात्यात मोठ्या रक्कमा वर्ग झाल्याचे आढळले. यानंतर बॅंकेकडून त्या आर्थिक व्यवहारांची माहिती मागविण्यात आली. सदर माहितीच्या पडताळणीत रमेश बसावे तसेच त्याच्या मित्राच्या खात्यावर शासकीय रक्कम वर्ग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चेकवरील सातारा तहसिलदारांची सही खोटी असल्याचे समोर आले. 

..अखेर दहा आंतरजातीय जाेडप्यांना ग्रामस्थांनी स्वीकारले

यानंतर या घटनाक्रमाबाबतचा अहवाल सातारा तहसिलदार कार्यालयाने वरिष्ठांना सादर केला. यानुसार बसावेच्या विरोधात शनिवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूक, अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची फिर्याद शासनाच्या वतीने विलास मधू पडोळकर (रा. शासकीय निवासस्थान, सदरबझार, सातारा) यांनी नोंदवली असून तपास सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकळे हे करीत आहेत. गुन्हा दाखल असणारा बसावे हा सध्या सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या शाखेत सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहे. 

तीन लाख 85 हजारांचा पुन्हा भरणा 

सातारा तहसिलदार कार्यालयात कार्यरत असताना बसावेने सातारा तहसिलदारांचे चेकबुक चोरत खोट्या सह्या करुन शासकीय खात्यातील 13 लाख 65 हजारांची रोकड लांबवली होती. तपासणीत हे समोर आल्यानंतर हादरलेल्या बसावेने प्रकरण जास्त अंगावर शेकू नये, यासाठीच्या हालचाली सुरु केल्या. याच दरम्यान बसावेने पुन्हा सातारा तहसिलदार यांच्या शासकीय खात्यात पुन्हा तीन लाख 85 हजारांचा भरणा केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर बसावेने अपहार केलेल्या रक्कमेचा वापर नेमका कशासाठी केला, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

सिंघम है, सिंघम है, साहब हमारा सिंघम है कऱ्हाडामध्ये घोषणा दणाणल्या

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.