गाव कारभा-यांच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यात मतदान सुरु; 19 हजार 467 कर्मचा-यांची फाैज

गाव कारभा-यांच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यात मतदान सुरु; 19 हजार 467 कर्मचा-यांची फाैज
Updated on

सातारा: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Gram Panchayat Election) मतदानासाठी तब्बल 19 हजार 467 शासकीय कर्मचारी राबणार असून, 652 ग्रामपंचायतींसाठी एकूण दोन हजार 38 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी 401 निवडणूक निर्णय अधिकारी, सहा हजार 114 मतदान कर्मचारी दोन हजार 38 मतदान केंद्राध्यक्षांसह दोन हजार 322 आशा व अंगणवाडी सेविक या प्रक्रियेत सहभागी आहेत. सर्वाधिक कर्मचारी कऱ्हाड, खटाव, फलटण आणि सातारा तालुक्‍यांत आहेत.
 
राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिय या वेळेस सातारा जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून मतदान व मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम होत असून, प्रत्यक्षात 652 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. 223 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. तीन ग्रामपंचायतींत उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. आज (शुक्रवार) मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. दोन हजार 38 केंद्रांवर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी तब्बल 19 हजार 467 कर्मचारी राबत आहेत. 

धक्के देणाऱ्या उदयनराजेंना ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाचा बसणार धक्का?

मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेमध्ये 401 निवडणूक निर्णय अधिकारी, 598 एआरओ, 124 क्षेत्रीय अधिकारी, दोन हजार 38 मतदान केंद्राध्यक्ष, सहा हजार 114 मतदान कर्मचारी, दोन हजार 38 शिपाई आणि दोन हजार 322 अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत सात ते दहा कर्मचारी लागतात. ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्र संख्येनुसार कर्मचारी संख्या कमी अधिक होते. त्यानुसार गुरुवारी ही यंत्रणा साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातून गावागावांकडे रवाना झाली. सर्वाधिक ग्रामपंचायती या सातारा 89, कऱ्हाड 87, तर पाटणला 72 असून, त्यासोबतच जावळी 37, कोरेगाव 49, वाई 57, महाबळेश्‍वर 14, खंडाळा 50, फलटण 74, माण 47, खटाव 76 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; भाजप राज्यभर उठाव करणार 

तालुकानिहाय मतदान कर्मचारी संख्या 

तालुकानिहाय मतदानासाठी लागणारी कर्मचारी संख्या अशी : सातारा- 2942, जावळी- 813, कोरेगाव- 1378, वाई- 1484, महाबळेश्‍वर- 345, खंडाळा- 1248, फलटण- 2355, माण- 1399, खटाव- 2447, कऱ्हाड- 3151, पाटण- 1905. 


कारभाऱ्यांच्या निवडीस 3500 पोलिस तैनात 

गावांच्या कारभाऱ्यांच्या निवडीसाठी होणाऱ्या मतदानावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. त्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड मिळून सुमारे साडेतीन हजार जणांना निवडणुकांच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मागील महिन्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली. त्यात बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिल्यामुळे केवळ 652 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिस अधीक्षकांपासून उपनिरीक्षकांपर्यंत तब्बल 148 पोलिस अधिकारी उद्या जिल्ह्यातील रस्त्यांवर तैनात असणार आहेत. त्याचबरोबर सहायक फौजदार ते शिपायापर्यंत दोन हजार 250 पोलिस कर्मचारीही बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. त्यांच्या जोडीला जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांत एकूण एक हजार 200 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलालाही पाचारण करण्यात आले आहे. राज्य राखीव दलाच्या 100 जणांची एक कंपनी व 30- 35 जणांची एक प्लॅटूनही जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे. याबरोबरच एसआरपी व निवृत्त अधिकाऱ्यांतून विशेष पोलिस अधिकारीही निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील बंदोबस्ताबरोबरच निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरात गस्तीसाठी पोलिस गाड्या असणार आहेत. पोलिस ठाण्यांकडील सुमारे 50 गाड्यांबरोबरच उपअधीक्षक कार्यालय, निर्भया पथक, तसेच पीसीआरच्या गाड्याही याकामी वापरण्यात येणार आहेत. पोलिसांच्या वाहनांच्या जोडीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही 50 ते 60 गाड्या पोलिसांना गस्तीसाठी देण्यात आल्या आहेत. 

राखीव पोलिससह सज्ज 

बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांव्यतिरिक्त असलेल्या पोलिसांना राखीव ठेवण्यात आलेले आहे. एखाद्या ठिकाणी आवश्‍यकता भासल्यास या पोलिसांची कुमक तातडीने पुरवता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.