विसापूर (जि. सातारा) : गावात पॅनेलचे बहुमत नसतानाही सरपंच आरक्षण पदाचा एकमेव उमेदवार निवडून आला. त्यामुळे सरपंच निवडी अगोदरच गुलालाची उधळण करून सरपंच आपल्याच पॅनेलचा होणार असल्याने गावातून विजयी मिरवणूक काढण्याचा प्रकार खटाव तालुक्यातील विसापूर आणि मोळ येथे घडला. या दोन्ही गावांत "गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था बहुमत असणाऱ्या पॅनेलची झाली आहे.
विसापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुरंगी लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विचाराच्या सागर साळुंखे गटाने 13 पैकी नऊ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आमदार महेश शिंदे यांच्या विचाराच्या हरी सावंत गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले. सरपंचपदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तेथे अनुसूचित जातीची आरक्षित महिलेची एकमेव जागा हरी सावंत गटाने जिंकली आहे. त्यामुळे बहुमत नसतानाही या गटाला सरपंचपद मिळणार असल्याने या गटाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण जाहीर होताच गुलालाची उधळण करीत गावातून विजयी मिरवणूक काढली.
मोळमध्ये हीच परिस्थिती उद्भवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विचाराच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने अरुण वाघ, रोशन घाडगे आणि महेंद्र नांगरे यांच्या नेतृत्वाखाली नऊ पैकी सहा जागा जिंकत बहुमत सिद्ध केले. श्रीकांत घोरपडे, संजय गुलाबराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने तीन जागा जिंकत बहुमतापासून दूर राहिल्याचे चित्र आहे. सरपंचपदासाठी आरक्षित अनुसूचित जातीचा आरक्षित पुरुष ही एकमेव जागा श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलकडे आहे. त्यामुळे बहुमत नसतानाही या पॅनेलला सरपंचपदाचा मान मिळणार असल्याने या पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विसापूर आणि मोळ या दोन्ही गावांत बहुमत सिद्ध करूनही सरपंचपदासाठी आरक्षित आरक्षणाच्या जागा पॅनेल पराभूत झाल्याने बहुमत असणाऱ्या पॅनेलची अवस्था "गड आला पण सिंह गेला' अशी झाली आहे.
मानलं! पालकमंत्री असावा तर असा; गाड्यांचा ताफा थांबवत बाळासाहेबांची अपघातग्रस्त दाम्पत्याला मदत
पुसेगावात पाच वर्षे राष्ट्रवादीचा सरपंच
पुसेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 17 पैकी प्रत्येकी सात जागांवर विजय मिळवून बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे सत्तेत दोन्ही पक्षांचा समान वाटा असल्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. मात्र, येथील सरपंचपदासाठी आरक्षित झालेली अनुसूचित जातीचा पुरुष ही एकमेव जागा राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी पाच वर्षे आता राष्ट्रवादीचाच सरपंच राहणार आहे.
फडणवीसांचा सवाल; ‘अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न कसे करू?’, पीएफसाठी धडपड
सरपंच आरक्षणावरुन वंचितचे मुख्यमंत्र्यांना पत्र; सोडत नव्याने घ्या
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.