कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी जिहेकरांनी राबवला महत्वपूर्ण उपक्रम!

Jihe Village
Jihe Villageesakal
Updated on

नागठाणे (सातारा) : कोरोनाच्या (coronavirus) पहिल्या लाटेचा मोठा तडाखा सहन केलेल्या जिहे (ता. सातारा) गावाने या वेळी लोकसहभागातून भरीव कामगिरी बजाविली आहे. 'ग्रामसेवा मंच आपल्या दारी' या उपक्रमाची (Gramseva Manch Aaplya Dari Activities) अंमलबजावणी करताना येथील ग्रामस्थांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. (Gramseva Manch Aaplya Dari Activities Of The Citizens Of Jihe Village For The Fight Against Corona Satara Marathi News)

Summary

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी जिहे गावावर मोठे संकट ओढविले होते. त्यात बाधितांच्या मोठ्या संख्येमुळे गावाला विविध समस्यांना सामोरे जावे लागले.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी जिहे गावावर (Jihe Gram Panchayat) मोठे संकट ओढविले होते. त्यात बाधितांच्या मोठ्या संख्येमुळे गावाला विविध समस्यांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर यंदा सारे ग्रामस्थ कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी एकवटले. आपले गाव आपली जबाबदारी या विचाराने सर्वजण कार्यप्रवण झाले. त्यातून 'समस्त ग्रामसेवा समन्वयक मंच' या नावाचे विचारपीठ तयार करण्यात आले. त्या माध्यमातून गावचे सार्वजनिक, सामाजिक आरोग्य (Health Department Jihe) अन् शिक्षण या दोन कळीच्या मुद्यांवर प्राधान्याने कार्य करण्याची सर्व समन्वयकांनी शपथ घेतली. ग्रामस्थांनी लोकसहभागातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिनसह (Oxygen concentrator machine) एक हजार दर्जेदार मास्क, सॅनिटायझर घेतले.

Jihe Village
जनभावनेचा विचार न केल्यास 54 गावांतील लोक आंदोलन छेडणार!

साहित्य खरेदीसाठी केलेल्या आवाहनानंतर केवळ दोनच दिवसांत मोठी रक्कम उभी राहिली. त्यातून गावासाठी साहित्य उपलब्ध झाले. ते आपत्कालीन प्रसंगी गावच्या रुग्णांना सहज, मोफत उपलब्ध व्हावे या हेतूने येथील आरोग्य उपकेंद्रास संलग्न केले आहे. साहित्य प्रदान कार्यक्रम चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख (Chincher Primary Health Center) वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस व डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमात गावासाठी आरोग्य सेवा करणारे डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांचाही सत्कार करण्यात आला आहे.

Gramseva Manch Aaplya Dari Activities Of The Citizens Of Jihe Village For The Fight Against Corona Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.