बदलापूर आणि कोलकाताच्या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातही महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर असून, महिला व मुलींची सातत्याने छेडछाड करताना सलग तिसऱ्यांदा सापडल्यास पोलिसांनी (Police) संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सक्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत. जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कडक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व बस, रिक्षा, वडाप यामध्ये क्यूआर कोड लावण्यात येणार असून, या प्रवासादरम्यान कोणी छेडछाड केल्यास क्यूआर कोड स्कॅन केल्यास तातडीने पोलिसांना अलर्ट जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.