सातारकरांनाे... हीच ती वेळ; बेफिकीरी नको

सातारकरांनाे... हीच ती वेळ; बेफिकीरी नको
Updated on

सातारा : लॉकडाउन संपून बहुतांश गोष्टी अनलॉक झालेल्या आहेत. त्यामुळे आता हे रोजचेच आहे, असे म्हणून अनेक जण कोरोनाच्याबाबतीत बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. मात्र, आत्ताची परिस्थिती अत्यंत भयावह अशी आहे. उपचाराच्या योग्य सुविधा पुरवण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. त्यामुळे निर्बंध उठले तरी, काळजीची हीच खरी वेळ आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 23 मार्च रोजी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. प्रशासन व नागरिक दोघांनीही अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन केले. सार्वजनिक वावर टाळला, शारीरिक अंतर व मास्कचा वापर केला. एवढी काळजी घेऊनही कोरोना विषाणूचा जिल्ह्यामध्ये शिरकाव झालाच. परदेशातून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात समोर आलेला कोरोना आता कोणापासून होतोय, हे न कळण्याच्या पातळीवर गेला आहे. त्या वेळी आपल्यापर्यंत नाही यायचा, हे अनेकांचे तर्क कोरोनाने उधळून लावले आहेत. आता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, डोंगरदऱ्यांत सगळीकडे कोरोनाचा प्रसार झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांनी हा हा म्हणता 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये मागील महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. मृतांच्या आकड्याने चारशेचा आकडा ओलांडला आहे.

गणेशोत्सवात वाढला कोरोनाचा संसर्ग; जिल्ह्यात 57 हजारावर भाविकांची एंट्री 

बाधितांच्या वाढीचा व मृत्यूचा आकडा वाढत आहे. परंतु, अर्थकारणाला गती देण्याचे दुसरे मोठे आव्हान समोर असल्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रशासनाने अनेक निर्बंध शिथिल करत आणले. सध्या बहुतांश निर्णय शिथिल झाले आहेत. जिल्हांतर्गत प्रवासाची बंदी उठली आहे. दुकानांना परवानगी मिळाली आहे. आजवर ज्या-ज्या टप्प्यात शिथिलता मिळाली, त्या-त्या वेळी नागरिक अनिर्बंधपणे रस्त्यावर येऊन गर्दी झाल्याचे चित्र समोर आले आहे.

सांगलीतील कुटुंबाचा खून करणारा जावळीतील युवक जेरबंद  

अगदी गणेशोत्सवाच्या काळातही बाजारपेठेतील गर्दी कमी झाली नव्हती. गर्दीमध्ये शारीरिक अंतराच्या पूर्ण चिंधड्या उडत आहेत. त्यामुळे नागरिकांना काही गांभीर्य आहे की नाही, असा सहज प्रश्‍न उपस्थित होतो आहे. ज्या वेळी अगदी हाताच्या बोटवर रुग्ण होते, तेव्हा प्रशासन व नागरिक दोघांकडून कडक नियम लादले व पाळले जात होते. परंतु, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज 500 ते 600 नव्या रुग्णांची भर पडत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होत नाहीत. रुग्णालयांना पुरेसा ऑक्‍सिजन मिळत नाही. अनेक व्यापारी बाधित होत आहेत. दररोज 12 ते 16 जणांना जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोणाकडूनच नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे काळजी घेण्याची हीच खरी वेळ आहे, याचे भान ठेवले तरच प्रत्येक जण आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतो, अन्यथा सगळेच रामभरोसे आहे.

आईनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी; दोघांना अटक  


...हे करा 

अत्यावश्‍यक असेल तरच घराबाहरे पडा.
 
घरातील ज्येष्ठांच्या, पूर्वीचे आजार असलेल्यांच्या संपर्कात जावू नका. 

बाहेर पडलाच तर, शारीरिक अंतराचा नियम पाळाच. 

दररोज व्यायाम व प्राणायाम करा. 

प्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घ्या. 

आजारी पडल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखवा. 

सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा

सातारा जिल्ह्यातील रुग्णालयांतील बेडची स्थिती... 

बेडचा प्रकार : एकूण बेड : उपलब्धता 

कोरोना केअर सेंटर : 3031 : 2,000 

ऑक्‍सिजन बेड : 270 : नाही 

व्हेंटिलेटर बेड : 172 : नाही

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.