तांबवे : स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मी गद्दारी, घराणेशाही, बंडखोरीच्या तसेच तालुक्यात चाललेल्या राजकीय बजबजपुरीविरोधात संघर्ष करत आहे. माझा लढा हा निष्ठा आणि विचारासाठी असून, त्यास जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पाटण मतदारसंघातील लोकांना आता परिवर्तन हवे आहे. या लढाईची पोच जनता या निवडणुकीत मला देईल, अशी आशा महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांनी व्यक्त केली.
श्री. कदम यांनी तांबवे विभागात गाव भेट प्रचार दौरा केला. त्यादरम्यान ते मतदारांशी संवाद साधत होते. तालुकाप्रमुख सुरेश पाटील, सचिन आचरे, संजय संकपाळ, रामचंद्र पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, ‘‘माझी उमेदवारी ही सर्वसामान्य नागरिकांचा आरसा आहे. स्वार्थी राजकारणासाठी नेत्यांनी घराघरांत, गावागावांत भांडणे लावली. लोकांची गटातटात विभागणी करून गुण्यागोविंदाने राहणाऱ्या एकत्रित कुटुंबात कलह निर्माण केला. त्यांना समाजहितापेक्षा स्वतःचे व स्वतःच्या वारसदारांचे राजकीय वलय आणि करिअर महत्त्वाचे आहे. गेली अनेक वर्षे देसाई- पाटणकर घरातच पाटणची सत्ता राहिली आहे.
मात्र, तेच एकमेकांवर तालुक्यात विकास झाला नसल्याची टीका करत जनतेला खेळवत असतात. सत्ता तुम्ही दोघांनीच भोगली आहे. त्यामुळे विकास नेमका कुणी केला नाही, हे स्पष्ट करावे.’’
प्रस्थापित नेत्यांची हुकूमशाही, दडपशाही व गटातटाच्या राजकारणाला येथील जनता कंटाळली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बदल अटळ आहे.
पाटण मतदारसंघातील लोकांना आता परिवर्तन हवे आहे. या लढाईची पोच जनता या निवडणुकीत मला देईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेचे प्रतीक असून, मी आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असेन, असे त्यांनी सांगितले.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.