नवीन महाबळेश्वर प्रकल्पात पर्यटन शेतीपूरक उद्योगांना वाव आहे. या भागात ऐतिहासिक किल्ले वासोटा, महीमंडन गड, राजे चंद्रराव वाडा असे किल्ले आहेत.
कास : कोयना भागातील लोकांनी आतापर्यंत विविध जाचक अटींसह कोयना धरण, व्याघ्र प्रकल्प, बफर झोन आदी जाचक प्रकल्पांचा सामना केला आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील लोकांसाठी काहीतरी विकासात्मक काम होत असेल, तर त्यात या भागाशी काहीही संबंध नसणाऱ्यांनी लुडबूड करून पर्यावरणाच्या नावाखाली प्रकल्पाला विरोध करू नये, असे आवाहन कोयना धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष एच. बी. जंगम यांनी केले.