Satara Rain : बिजवडी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; डाळिंब बागांना मोठा फटका

बिजवडी (ता. माण) परिसरासह जाधववाडी, तोंडले येथे दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
Pomegranate Orchards in Bijwadi Satara
Pomegranate Orchards in Bijwadi Sataraesakal
Updated on
Summary

बिजवडी, जाधववाडी, तोंडले परिसराला गेला आठवडाभर पाऊस हुलकावणी देत होता. मात्र, अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला.

बिजवडी : बिजवडी (ता. माण) परिसरासह जाधववाडी, तोंडले येथे दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. मोठमोठ्या गारा पडल्याने जाधववाडी, बिजवडीतील डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. तोंडले येथे वादळामुळे विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. ऐन उन्हाच्या गर्मीत पावसाच्या थंडाव्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असले तरी पाणीटंचाईचा सामना करत फळबागा धरलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Pomegranate Orchards in Bijwadi Satara
Konkan Rain : वादळी पावसाचा खेड, चिपळूणला तडाखा; आंबा पिकांचे मोठे नुकसान, महाकाय वृक्ष कोसळले

त्यामुळे या वादळी पावसामुळे कही खुशी कही गमचे वातावरण निर्माण झाले आहे. बिजवडी, जाधववाडी, तोंडले परिसराला गेला आठवडाभर पाऊस हुलकावणी देत होता. मात्र, आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. क्रॉप कव्हर टाकलेल्या बागेत गारांचा खच पडला होता. यात अनेक शेतकऱ्यांची झाडेही उन्मळून पडली, तर विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

या भागातील बहुतांश सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे टँकर सुरू आहेत. तरीही या भागातील शेतकऱ्यांनी धाडसाने विकतचे पाणी घालून बागांचे नियोजन केले आहे. काही बागांचे सेटिंग पूर्ण झाले आहे, तर काही बागांना फुलकळ्या निघत आहेत. वादळी वारा व गारांच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

Pomegranate Orchards in Bijwadi Satara
Konkan Rain : चिपळूण, खेडला वादळी पावसाचा तडाखा; मशिदीजवळ कोसळले झाड, पाहा Photo

दोन दिवसांपूर्वी सेटिंग झालेल्या डाळिंबाच्या बागेवर क्रॉप कव्हर टाकला होता. पाण्याची भीषण टंचाई असतानाही बाग धरली होती. फळांचे सेटिंगही चांगले झाले होते; परंतु गारांचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

-बबन भोसले, शेतकरी जाधववाडी

टंचाई परिस्थितीत विकतचे पाणी घालून डाळिंबाला बहार धरण्याचे धाडस केले होते. झाडांना नुकत्याच फुलकळ्या लागल्या होत्या. मात्र, वादळी वारा व गारांच्या पावसामुळे फुलकळ्या तुटून पडल्या आहेत. वाऱ्यामुळे झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे.

-शंकर जाधव, शेतकरी जाधववाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.